Konrad Bloch : जेव्हा एका ज्यू कुटुंबातील मुलगा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पटकावतो

युनायटेड स्टेट्समध्ये ब्लॉक यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि १९३८ मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी प्राप्त केली. त्यांनी १९३९ ते १९४६ दरम्यान कोलंबिया येथे अध्यापन केले. नंतर ते शिकागो विद्यापीठात गेले आणि मग हार्वर्ड विद्यापीठात १९५४ मध्ये बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले.

201
Konrad Bloch : जेव्हा एका ज्यू कुटुंबातील मुलगा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पटकावतो

कॉनराड ब्लॉक (Konrad Bloch) यांचा जन्म जर्मन साम्राज्याच्या प्रशिया प्रांतातील Nysa येथे ज्यू कुटुंबात २१ जानेवारी १९१२ रोजी झाला. त्यांचे कुटुंब अगदी मध्यमवर्गीय होते. १९३० ते १९३४ मध्ये त्यांनी म्युनिकच्या तांत्रिक विद्यापीठात रसायनशास्त्राचा अभ्यास केला. १९३४ मध्ये ज्यूंवर नाझींनी केलेल्या छळामुळे १९३६ मध्ये ते युनायटेड स्टेट्समध्ये गेले. त्याआधी ते स्वित्झर्लंडमधील दावोस येथील Schweizerische Forschungsinstitut येथे पळून गेले.

(हेही वाचा – Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! ‘या’ भागात पावसाची शक्यता)

पुढे त्यांची (Konrad Bloch) येल मेडिकल स्कूलमध्ये जैविक रसायनशास्त्र विभागात नियुक्ती झाली. मग युनायटेड स्टेट्समध्ये ब्लॉक यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि १९३८ मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी प्राप्त केली. त्यांनी १९३९ ते १९४६ दरम्यान कोलंबिया येथे अध्यापन केले. नंतर ते शिकागो विद्यापीठात गेले आणि मग हार्वर्ड विद्यापीठात १९५४ मध्ये बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर म्हणून रुजू झाले.

(हेही वाचा – Jack Nicklaus : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वकालीन महान गोल्फर जॅक निकलॉस यांच्याबद्दल)

१९७९ ते १९८४ दरम्यान त्यांनी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक (Konrad Bloch) म्हणून काम केले. कोलेस्टेरॉल आणि फॅटी ऍसिड चयापचय यंत्रणा आणि नियमन यासंबंधीच्या शोधांसाठी त्यांना १९६४ मध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. १९८५ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो बनले. १९८८ मध्ये त्यांना राष्ट्रीय विज्ञान पदक देण्यात आले. ते अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, युनायटेड स्टेट्स नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले. (Konrad Bloch)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.