प्रदीप रावत (Actor Pradeep Rawat) हे एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते आहेत. ते दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारतात. बी. आर. चोप्रांच्या महाभारत या मालिकेतून त्यांनी पहिली भूमिका साकारली, ती म्हणजे अश्वत्थामाची… प्रदीप रावत यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये जसे की लगान, सरफरोश, गजनी, अशा भूमिका साकारल्या आहेत.
(हेही वाचा – Jack Nicklaus : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वकालीन महान गोल्फर जॅक निकलॉस यांच्याबद्दल)
सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार –
प्रदीप रावत (Actor Pradeep Rawat) यांचा जन्म २१ जानेवारी १९५२ रोजी जबलपूर, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांनी तेलुगू, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये खलनायकांची भूमिका साकारल्या. Sye नावाच्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि संतोषम चित्रपटासाठीदेखील सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच वर्षी याच चित्रपटासाठी प्रदीप रावत यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा “नंदी पुरस्कार” देखील देण्यात आला होता.
(हेही वाचा – Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! ‘या’ भागात पावसाची शक्यता)
शांत आणि उदारमतवादी व्यक्ती –
नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी ‘आयफा अवॉर्ड्स’साठीही (Actor Pradeep Rawat) त्यांची निवड झाली होती. प्रदीप जरी त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जात असले तरी ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूपच शांत आणि उदारमतवादी व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे त्यांनी भोजपूरी, ओडिया, इंग्रजी, कन्नड सिनेमांतही काम केलं आहे. गजनी या त्यांच्या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु आहे. (Actor Pradeep Rawat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community