समाज सुधारणा चळवळीचे नेतृत्व केलेले गुजरातीमधील प्रसिद्ध कवी Dalpatram Dahyabhai Travadi

194
दलपतराम (Dalpatram Dahyabhai Travadi) यांचा जन्म २१ जानेवारी १८२० रोजी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वाधवान शहरात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दह्याभाई. दलपतराम लहानाचे मोठे धार्मिक वातावरणात झाले. लहानपणापासून त्यांची प्रतिभा दिसू लागली होती. ते १२ वर्षांचे असतानाच होंडुला ही स्थानिक काव्य रचना केली आणि आपले विलक्षण साहित्यिक कौशल्य दाखवले.
स्वामिनारायणांचे भक्त ब्रह्मानंद स्वामींच्या तालमीखाली त्यांनी यमक, कविता आणि ‘व्रजभाषा’ या रचनांवर प्रभुत्व मिळवले आणि नंतर वयाच्या २४ व्या वर्षी अहमदाबादला गेले. त्यांनी नाटक, कविता, गाणी, निबंध आणि अनेक लेख लिहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ६ पुस्तके लिहिली आणि २५ पुरस्कार मिळवले आहेत. हरिलीला अमृत, वेण चरित्र, मिथ्याभिमान आणि लक्ष्मी हे (Dalpatram Dahyabhai Travadi) त्यांचे साहित्य क्षेत्रातले मोठे योगदान मानले आहे.
साहित्य रचण्याबरोबर त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. त्यांनी (Dalpatram Dahyabhai Travadi) अहमदाबादमध्ये सामाजिक सुधारणा चळवळींचे नेतृत्व केले. अंधश्रद्धा, जातीवाद आणि बालविवाह या प्रथेच्या विरोधात त्यांनी अनेक लेख लिहिले. तसेच विधवा पुनर्विवाहाची समस्या त्यांनी वेणचरित्र या कवितेत मांडली. ते पुरोगामी विचारवंत होते आणि त्यांनी शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि महिला सक्षमीकरणाचादेखील पुरस्कार केला आहे. त्यांनी आपल्या साहित्यिक कौशल्याचा उपयोग समाजात बदल घडवून आणण्यासाठी केला. कविश्वर दलपतराम हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.