अहमदाबादमधील अनेक गर्भवती जोडप्यांनी 22 जानेवारीला त्यांच्या बाळांनी जगात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे अहमदाबाद मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्ष आणि बालरोगतज्ञ डॉ. मोना देसाई यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात दक्षिण भोपाळमधील सान्निध्य मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील कन्सल्टंट गायनॅकलॉजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) यांनी माहिती दिली की, आमच्याकडे उच्चभ्रू घरातील ७ जोडपी आहेत. ज्यांनी 22 जानेवारीला प्रसूतीसाठी विनंती केली आहे. त्यापैकी चौघांना सुरक्षित पद्धतींचे पालन करून लवकर प्रसूती करण्यासाठी औषधे दिली जातील.
ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या म्हणण्यानुसार,
डॉ. जिग्नेश शाह यांनी सांगितले की, दोन गर्भवती जोडप्यांनी त्यांच्या बाळांना दुपारी 12.20 ते 12.35 दरम्यान जन्म देण्याची विनंती केली आहे कारण त्या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा नियोजित आहे. डॉ. शाह यांचे भोपाळमधील घोडासर परिसरात स्वतंत्र क्लिनिक आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अहमदाबादमधील ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या (AOGS) समितीवरदेखील काम करतात. 22 जानेवारीला 100पेक्षा जास्त शस्त्रक्रियांची पूर्वीच नोंदणी करण्यात आली आहे. या शस्त्रक्रिया सी-विभागांची (C-Section) (Cesarean section) अंतर्गत केल्या जातील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. यापैकी बहुतांश शस्त्रक्रिया 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनीही करण्याचे नियोजन आहे.
सी-सेक्शनअंतर्गत २२ जानेवारीला “शुभ दिनी” प्रसुती होण्याबाबत डॉक्टरांना विनंती
२२ जानेवारीला राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी बाळाचा जन्म होण्याबाबत फक्त अहमदाबादच नाही, तर सुरत आणि राजकोट येथील जोडप्यांनी नियोजन केले आहे. याबाबत सुरतमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद वाडेकर यांनी सांगितले की, बाळांच्या माताच डॉक्टरांना सी-सेक्शनअंतर्गत २२ जानेवारीला “शुभ दिनी” प्रसुती होण्याबाबत डॉक्टरांना विनंती करत आहेत तसेच सुरतमधील रमेश मोदी या अजून एका स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले की, काही जोडप्यांनी तर बाळांची नावेही आधीच ठरवली आहेत. मुलगा झाला तर त्याचे नाव ‘राम’ आणि मुलगी जन्माला आली तर ‘जानकी’, अशी नावे अनेक जोडप्यांनी त्यांच्या अपत्याचे नाव ठरवले आहे.
200 सिझेरियन प्रसूती अपेक्षित
राजकोटमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांकडून 22 जानेवारीला सुमारे 200 प्रसूती अपेक्षित आहेत. साधारणपणे, इंग्रजी कॅलेंडरमध्ये 14 फेब्रुवारीसारख्या विशेष तारखांवर किंवा जन्माष्टमीसारख्या हिंदूंच्या पवित्र दिवशी सी-सेक्शन डिलिव्हरीसाठी गर्दी असते. या वेळी, सिझेरियन प्रसुतीचे नियोजन रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवश होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community