Ram Mandir Pranpratistha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १५ हजार प्रसादाचे बॉक्स तयार; काय आहे वैशिष्ट्य ? जाणून घ्या

प्रसादाचे ५ लाख लाडू मध्य प्रदेशातील इंदोर येथून पाठवण्यात आले आहेत.

199
Ram Mandir Pranpratistha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १५ हजार प्रसादाचे बॉक्स तयार; काय आहे वैशिष्ट्य ? जाणून घ्या
Ram Mandir Pranpratistha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १५ हजार प्रसादाचे बॉक्स तयार; काय आहे वैशिष्ट्य ? जाणून घ्या

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pranpratistha Ceremony) सोहळ्यामुळे देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रामलल्लाचा अभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. विविध देशात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्यदिव्य अशा या सोहळ्यानिमित्त दिला जाणारा प्रसादही खास आहे.

अयोध्येत श्री राम मंदिर सोहळ्याकरिता येणाऱ्या वीवीआयपी आणि साधुसंतांना देण्यासाठी किमान १५ हजार प्रसादाचे पुडे (बॉक्स) तयार करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रसादाचे ५ लाख लाडू मध्य प्रदेशातील इंदोर येथून पाठवण्यात आले आहेत.

(हेही पहा – Parakram Divas: लाल किल्ल्यावर इतिहास आणि सांस्कृतिक देखाव्याचे दर्शन, पंतप्रधानांच्या हस्ते 23 जानेवारीला उद्घाटन)

शरयूचे पवित्र जल, हनुमान गढीचे शेंदूर, पंचखाद्याचे लाडू 

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवर आणि भाविक भक्तांना दिला जाणारा प्रसादही खास आहे. या प्रसादाच्या पुड्यामध्ये पंचखाद्यापासून तयार केलेले ५ लाडू आहेत तसेच शरयू नदीचे पवित्र जल आणि हनुमान गढीला मिळणारे शेंदूरही या प्रसादासोबत देण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.