पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये गेले तेव्हा त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. या दौऱ्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आले पण त्यांना जवळच भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देण्याची त्यांना आठवण झाली नाही, अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन २२ आणि २३ जानेवारीला नाशिकमध्ये होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात गेले. पूजा केली भव्य रॅलीही काढली. पण त्यांना भगूरच्या सावरकरांच्या स्मारकावर जावे वाटले नाही. त्यांना सावरकरांची आठवण झाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही, पण उद्धव ठाकरे जातील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करतील. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा FMR : भारत-म्यानमारची सीमा होणार बंद; काय आहे Modi Government चे धोरण?)
उद्धव ठाकरे गोदातीरावर आरती करणार
उबाठाचे २२ आणि २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. यावेळी २२ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात पूजा करणार आहेत, तर २३ जानेवारी रोजी अधिवेशन असेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले,
Join Our WhatsApp Community