Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी प्राण त्यागणारे Devidin Pandey कोण होते?

231

मुघल किंवा अरब आक्रमकांनी इथे वास्तू निर्माण केल्या ही खूप मोठी थाप आहे. ते इथे काही निर्माण करायला आले नव्हते, ते उद्ध्वस्त करायला आले होते. ज्याप्रमाणे कुतुबुद्दीनने कुतुबमिनार निर्माण केले नाही. त्याप्रमाणे बाबरने नव्याने मशिद निर्माण केलीच नव्हती. ती बळकावलेली जागा होती. राम मंदिर पाडून निर्माण केलेला ढांचा होता हे सिद्ध झालं असून आता राम मंदिर निर्माण होत आहे आणि आज प्राणप्रतिष्ठा सोहळा.

रामजन्मभूमी आंदोलनात अनेकांनी योगदान दिले आहे. अनेकांनी बलीदान दिले आहे. त्यामध्ये देवीदीन पांडे (Devidin Pandey) यांचे नाव आदराने घेतले जाते. १५२८ पासून प्रत्येक भारतीय हिंदू रामजन्मभूमीसाठी लढतोय. बाबरने केलेल्या हल्ल्यानंतर पुढच्या दोन वर्षात हिंदू वीरांनी बाबरच्या सैन्याशी चार-पाच वेळा जोरदार लढा देऊन त्याच्याकडून सुरू असलेली अवैध बांधकामे थांबवली होती.

(हेही वाचा Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिरात स्थापन होणाऱ्या बालस्वरूप रामललाच्या मूर्तीची निर्मिती कशी झाली?)

देवीदीन पांडे (Devidin Pandey) हे जन्माने ब्राह्मण होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या धर्माचे संस्कार केले होते. रामजन्मभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे पांडे यांचे गरम रक्त उसळले आणि त्यांनी बाबरशी दोन हात करण्याचा निश्चय केला. युद्धामध्ये तर त्यांना मुघल सैनिकांनी एकटं पाडलं होतं, चहुकडे मुघल आणि मध्ये पांडेजी. मात्र पांडे घाबरले नाहीत. सैनिकांनी त्यांच्यावर विटा फेकल्या, पण त्यांनी आपली पगडी खाली पडू दिली नाही. त्यांनी अशा परिस्थितीतही बाबरच्या सेनापतीला जखमी केले.

त्यानंतर त्यांनी एकच प्रहार केला आणि माहुताला यमसदनी पाठवले. मात्र त्या हत्तीवर बसलेल्या मीर बाकी या सेनापतीने बंदूकीची गोळी झाडली ज्यामुळे देवीदीन यांचे शरीर जमिनीवर कोसळले. पण त्याआधी मुघल सैनिकांनी या हिंदुवीराचा रुद्र अवतार पाहिला होता आणि यापुढेही जोपर्यंत शेवटचा हिंदू जगाच्या पाठीवर आहे तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार अशी ग्वाहीदेखील त्यांनी आपल्या पराक्रमातून दिली. ९ जून १५२८ रोजी देवीदीन पांडे (Devidin Pandey) यांनी बलिदान दिले. आज राम मंदिर उभे राहत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.