SBI Report: राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला चालना, उत्तर प्रदेश सरकारला होणार किती कमाई; वाचा सविस्तर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवालानुसार (SBI Report) उत्तर प्रदेश राज्याला केंद्राच्या तीर्थक्षेत्र पुनरुत्थान आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान (प्रसाद) योजनेचा मोठा लाभ मिळत असल्याचे दिसते.

293
SBI Report: राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला चालना, उत्तर प्रदेश सरकारला होणार किती कमाई; वाचा सविस्तर
SBI Report: राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला चालना, उत्तर प्रदेश सरकारला होणार किती कमाई; वाचा सविस्तर

सोमवारी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. राम मंदिराचे दर्शन भक्तजनांकरिता सुरू झाल्यावर अयोध्येतील पर्यटनाला चालना मिळेल, अशी माहिती एसबीआय (SBI Report) रिपोर्टनुसार देण्यात आली आहे.

२०२२च्या तुलनेत यावर्षी २०२४ साली उत्तर प्रदेशात पर्यटकांचा ओघ वाढणार असून यामुळे राम मंदिरामुळे पर्यटनाला चालना मिळेल. अयोध्येतील राम मंदिर आणि पर्यटन विभागाला चालना मिळावी यासाठी केलेला खर्च ४ कोटींपेक्षा जास्त आहे. भारतातील अंदाजे 1.1 अब्ज हिंदूंसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्यामध्ये आधीच आर्थिक भरभराट होत आहे. अनेक कंपन्या येथे व्यवसाय सुरू करणार आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात पर्यटन क्षेत्राला चालना मिळाल्यामुळे सरकारलाही मोठी कमाई होत आहे.  यासंदर्भात एसबीआय रिपोर्टमध्ये विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ram Mandir Pranpratistha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त १५ हजार प्रसादाचे बॉक्स तयार; काय आहे वैशिष्ट्य ? जाणून घ्या)

20-25 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवार २१ जानेवारी, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवालानुसार (SBI Report) उत्तर प्रदेश राज्याला केंद्राच्या तीर्थक्षेत्र पुनरुत्थान आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान (PRASHAD) योजनेचा मोठा लाभ मिळत असल्याचे दिसते. राम मंदिर आणि राज्य सरकारच्या इतर पर्यटन योजनांमुळे यूपी सरकारला मोठा पैसा मिळणार आहे. संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की उत्तर प्रदेश सरकारला आर्थिक वर्ष 2025 मध्ये 20,000 ते 25,000 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई होऊ शकते.

यूपीचा जीडीपी नॉर्वेला मागे टाकेल
अयोध्या राममंदिरामुळे उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्राला किती चालना मिळेल याचा अंदाज व्यक्त करताना या अहवालात 2028 या आर्थिक वर्षात 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण होईल. असे झाल्यास उत्तर प्रदेशचा जीडीपी 500 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकतो. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2028 पर्यंत, उत्तर प्रदेश देशाच्या जीडीपी (इंडिया जीडीपी) मध्ये वजनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि राज्याचा जीडीपी नॉर्वेपेक्षा जास्त असेल.

उत्तर प्रदेशात पर्यटकांना दुप्पट खर्च होणार!
स्टेट बँकेच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, उत्तर प्रदेश सरकारच्या बजेटनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कर महसूल 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. SBI संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे की 2022 च्या तुलनेत उत्तर प्रदेशातील पर्यटकांनी केलेला खर्च 2024 मध्ये जवळपास दुप्पट होईल. अयोध्येतील राम मंदिरामुळे आणि उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे पर्यटकांचा खर्च ४ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल.

हेही पहा – 


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.