“रामजी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच मे जगत के पालनहारी.” सुमारे ५०० वर्षांच्या लढ्याला आज यश आले आहे. १५२८ ते ९ नोव्हेंबर २०१९ आणि २२ जानेवारी २०२४ या दिवसाला हिंदू भावविश्वात वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. २०१९ ला ५ न्यायाधीशांचुआ घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आणि हिंदूंच्या बलिदानाला न्याय मिळाला.
हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण जगाच्या इतिहासात हे एकमेव उदाहरण आहे की, देश हिंदूंचा, रामजन्मभूमी हिंदूंची, ती तोडली अतिरेकी पद्धतीने मात्र हिंदूंनी लढा दिला लोकशाही पद्धतीने आणि तो लढा जिंकलादेखील. १८५३ मध्ये या लढ्याला लोकशाहीचे स्वरुप येऊ लागले. त्या काळात दंगली उसळल्या. १८५९ मध्ये ब्रिटिशांनी या जागेजवळ कुंपण घातले आणि मुस्लिमांना इमारतीच्या आतली जागा दिली आणि हिंदूंना बाहेरची. पण हिंदूंना तर रामललाचे मंदिर (Ayodhya Shri Ram Mandir) हवे होते. मंदिर वही बनाएंगे!
१९४९ ला तिथे रामाच्या मूर्ती सापडल्या आणि या मूर्तीचे पूजन सुरु झाले. स्वतंत्र भारतात १९५० ला फैजापूरच्या दिवाणी न्यायालयात पहिला खटला दाखल झाला. खरे तर दोन खटले दाखल झाले. म्हणजे रामललाची मूर्ती ठेवण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. १९९२ चे रामजन्मभूमी आंदोलन तर प्रचंड गाजले. हिंदूंनी बाबरी ढांचा पाडला. २००२ मध्ये रामभक्तांना गोधरामध्ये जीवंत जाळ्ण्यात आले आणि मग हा लढा सुरुच राहिला. नरेंद्र मोदींच्या काळात २०१९ ला हिंदूंना न्याय मिळाला.
आज प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Shri Ram Mandir) होत आहे. आज रामजन्मभूमी दिवस आहे म्हणजेच हिंदूंची दिवाळी… हिंदू अतिशय संयमाने हा उत्सव साजरा करतायत. कोणताही गोंधळ नाही, कोणत्याही दंगली नाहीत, उन्माद नाही. आहे ती फक्त भक्ती आणि डोळ्यांत आनंदाश्रू…
Join Our WhatsApp Community