मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब अटल सागरी सेतुवर रविवारी, २१ जानेवारी रोजी पहिला अपघात (Accident) झाला. हा भीषण अपघात दुसऱ्या वाहनाच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. न्हावा शेवा पोलिसांनी याप्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कारच्या चालकावर गुन्हा दाखल
डॅशकॅम फुटेजमध्ये वेगवान लाल रंगाची कार इतर गाड्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कार नंतर उजवीकडे वळली आणि दोन वेळा पलटी होण्यापूर्वी दुभाजकाला धडकली. फुटेजवरील वेळेनुसार हा अपघात (Accident) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नाही. या (Accident) प्रकरणी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गाडी एप्रिल 2017 ची असून याचा मालक सेकंड ओनर आहे. चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे.
Join Our WhatsApp Community