राम मंदिराच्या निमित्ताने २२ जानेवारीचा (Ayodhya Pran Pratishtha) दिवस उत्सवाचा आहे. राम मंदिर म्हणजे भारताच्या अस्मितेची प्रतिकृती आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा – LK advani Ram mandir : लालकृष्ण अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहाणार नाहीत; कारण…)
दरम्यान प्राण प्राणप्रतिष्ठेच्या आजच्या विधींना (Ayodhya Pran Pratishtha) सुरूवात झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी याचे फोटो शेअर केले आहेत. आजच्या या भव्य दिव्य अशा सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार व्हीआयपींना आमंत्रण देण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजेपासून मुख्य कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी शुभ मुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
Glimpses from the puja rituals at Ayodhya Ram Temple. Pranpratishtha ceremony taking place today.
(Pics: VHP spokesperson Sharad Sharma) pic.twitter.com/w0VpVEPv1x
— ANI (@ANI) January 22, 2024
(हेही वाचा – Mira Road Stone Pelting : हा मीरा रोड कि पाकिस्तान ? श्रीराम शोभायात्रेवर ‘अल्ला हूं अकबर’ घोषणा देत दगडफेक)
काश्मीरमधल्या बर्फाच्छादीत शिखरांपासून ते उन्हात न्हाऊन निघालेल्या कन्याकुमारीतील समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, रामनामाच्या (Ayodhya Pran Pratishtha) जयघोषाने भारतभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आता अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) ऐतिहासिक राम मंदिराच्या स्वरूपात ही भक्ती मूर्त रूप धारण करत आहे. हे भव्य मंदिर केवळ भव्यतेच्या बाबतीतच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या योगदानाच्या माध्यमातूनही भारताच्या एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून खंबीरपणे उभे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community