Ayodhya Ram Mandir : सोमवार, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. (Ayodhya Ram Mandir) दुपारी 12:29 मिनिटांनी हा प्रतिष्ठापनेचा मुहुर्त आहे. या वेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
या सोहळ्याचे मुख्य पुजारी आहेत काशीचे विद्वान आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित ! दीक्षित गुरुजी यांच्यासह 121 पुजारी ही दिव्य पूजा करणार आहे. (Laxmikant Dixit) मुख्य पुजारी आहेत.
(हेही वाचा – Ayodhya Rammandir : रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा साता-समुद्रापार उत्साह; जगभरात शेकडो कार्यक्रमांचे आयोजन)
आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय काशीमध्ये रहात आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या पूर्वजांनी नागपूर आणि नाशिक येथे अनेक धार्मिक अनुष्ठाने केली आहेत.
कोण आहेत आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित ?
आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित वाराणसी येथील मीरघाटमधील सांगवेद महाविद्यालयातील वरिष्ठ आचार्य आहेत. सांगवेद महाविद्यालयाची स्थापना काशी नरेश यांच्या काळात झाली होती. पंडित लक्ष्मीकांत यांचे नाव काशीमधील यजुर्वेदाच्या विद्वान आचार्यांमध्ये घेतले जाते. आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वेद आणि अनुष्ठानाची दीक्षा आपल्या काकांकडून (गणेश दीक्षित भट्ट) यांच्याकडून घेतली आहे.
लक्ष्मीकांत दीक्षित यांचा मुलगा सुनील दीक्षित यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता. दीक्षित यांच्या पिढीकडून आता श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
पंडित लक्ष्मीकांत यांचे पूर्वज पंडित गागा भट्ट हे आहेत. गागा भट्ट यांनी 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता. आता त्यांच्या 11 व्या पिढीकडून श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community