Ayodhya Pran Pratishtha : कॅनडामध्ये २२ जानेवारी हा दिवस ‘विशेष दिवस’ म्हणून जाहीर

"रामजी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी." सुमारे ५०० वर्षांच्या लढ्याला आज यश आले आहे. १५२८ ते ९ नोव्हेंबर २०१९ आणि २२ जानेवारी २०२४ या दिवसाला हिंदू भावविश्वात वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. २०१९ ला ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आणि हिंदूंच्या बलिदानाला न्याय मिळाला.

255
Ayodhya Pran Pratishtha : कॅनडामध्ये २२ जानेवारी हा दिवस 'विशेष दिवस' म्हणून जाहीर

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Pran Pratishtha) आज म्हणजेच सोमवार २२ जानेवारीला संपन्न होत आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या प्रसंगी केवळ देशातच नाही तर इतर देशांमध्येही खूप उत्साह आहे. दरम्यान, देश कॅनडामध्ये देखील राम मंदिराबद्दल प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तान या मुद्द्यावरून वाद सुरु आहेत. असे असूनही, जस्टीन ट्रुडो यांच्या सरकारने स्थानिक हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन २२ जानेवारी हा ‘विशेष दिवस’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Mira Road Stone Pelting : मीरा रोड परिसरात श्रीराम शोभायात्रेवर दगडफेक; पोलिसांचे शांततेचे आवाहन)

उद्घाटन सोहळा हे शांतता, एकता आणि सलोख्याच्या मूल्यांचे द्योतक – 

कॅनडातील (Ayodhya Pran Pratishtha) ऑन्टारियोमधील ओकविले आणि ब्रॅम्पटन या शहरांनी २२ जानेवारी हा विशेष दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला आहे. २२ जानेवारीचे महत्त्व लक्षात घेता, ओकविलेचे महापौर रॉब बर्टन आणि ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी हिंदू समुदायाच्या श्रद्धेचा सन्मान केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वावर त्यांनी भर दिला. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हे शांतता, एकता आणि सलोख्याच्या मूल्यांचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात)

५०० वर्षांचा अंत –

कॅनडातील स्थानिक (Ayodhya Pran Pratishtha) हिंदूंसाठी तिथल्या सरकारने २२ जानेवारी २०२४ हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा समारंभाचे नेतृत्व करतील.

(हेही वाचा – Ayodhya Rammandir : रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा साता-समुद्रापार उत्साह; जगभरात शेकडो कार्यक्रमांचे आयोजन)

या प्रसंगी देशभरातील (Ayodhya Pran Pratishtha) सन्माननीय लोकांना प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याच वेळी, इतर देशांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अमेरिका, बुडापेस्ट, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.