२२ जानेवारी या शुभदिनी अयोध्येत साक्षात वैकुंठ अवतरले आहे. (Ayodhya Rammandir) अयोध्या नगरी नववधूसारखी सजली आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रामभक्तांची ५०० वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. अत्यंत मंगलमय वातावरणात आणि वेद-मंत्रांच्या घोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रामलल्लाच्या दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचे मुख्य पुजारी आहेत सोलापूरचे; छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे असे कनेक्शन)
सोमवारी सकाळी मंगल ध्वनीने सोहळ्याची सुरुवात झाली. सकाळी 10 वाजेपासून 177 राज्यांतील 50 वाद्ये वाजवली गेली. अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर (Narendra Modi) बांधणाऱ्या कामगारांची भेट घेणार आहेत. कुबेर टिला येथे जाऊन भगवान शंकराची पूजा करणार आहेत. (shri ram mandir ayodhya)
अयोध्या धाम में श्री राम लला की प्राण-प्रतिष्ठा का अलौकिक क्षण हर किसी को भाव-विभोर करने वाला है। इस दिव्य कार्यक्रम का हिस्सा बनना मेरा परम सौभाग्य है। जय सियाराम! https://t.co/GAuJXuB63A
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
हे माझे मोठे भाग्य आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
या दिव्य क्षणाचे साक्षीदार होण्याचे सौभाग्य मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणी स्वतःच्या भावना x या माध्यमावर व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, ‘अयोध्याधाममध्ये श्री राम लल्ला यांच्या प्रतिष्ठापनाचा अलौकिक क्षण सर्वांना भावूक करणार आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग असणे हे माझे मोठे भाग्य आहे. जय सियाराम !’ (ram lala mandir ayodhya)
(हेही वाचा – Ayodhya Rammandir : रामलल्ला अवतरले; शुभमुहुर्तावर संपन्न झाली रामलल्लाची प्रतिष्ठापना)
राममंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
प्राणप्रतिष्ठेच्या या सोहळ्यासाठी चांदीचे छत्र घेऊन पंतप्रधान गर्भगृहात गेले. सोहळा चालू असतांना राममंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जगभरातील कोट्यवधी भाविक या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार झाले. (Ayodhya Ram mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community