Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल

अयोध्येतील राम मंदिर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

326
Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल

संपूर्ण देशाला प्रतीक्षा लागलेला अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्यानगरी सजली असून देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. याशिवाय सोशल मीडियावरूनही देशवासीय आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Ayodhya Ram Mandir)

अयोध्येतील रामी मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर केली आहे. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.


(हेही वाचा : Ayodhya Ram mandir : अयोध्या रामरंगी रंगली; राममंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर पंतप्रधानांची भावूक पोस्ट)

राम मंदिराच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. राम मंदिर होणं यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे.त्यांच्यासाठी महाराष्ट्रात जे चांगलं करता येईल त्या सर्व गोष्टी करा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.