Shri Ramlala pranpratishtha : अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठानिमित्ताने सोशल मीडियात काय आहेत भावना?

302

बहुचर्चित, बहुप्रतीक्षित अयोध्येत श्रीरामलला सोमवार, २२ जानेवारी रोजी विधिवत विराजमान (Shri Ramlala pranpratishtha) झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील ८ हजाराहून अधिक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असताना सोशल मीडियावर भक्तीचा महापूर उसळला आहे. सर्व क्षेत्रातील महत्वाचे व्यक्ती त्यांच्यातील भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. कोणी कशा भावना व्यक्त केल्या, जाणून घ्या.

(हेही वाचा Ayodhya Ram mandir : अयोध्या रामरंगी रंगली; राममंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर पंतप्रधानांची भावूक पोस्ट)

हिंदी चित्रपट अभिनेते अजय देवगन यांनी एक्सवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, हा दिवस इतिहासमध्ये त्या दिवसाची आठवण करुन देत आहे, जेव्हा आपल्या प्रत्येक रस्त्यावर जय श्री राम च्या घोषणेने दुमदुमले होते.

अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की, जवळपास 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. आमचे रामलला घरी परतले आहेत. #RamMandirPranPrathistha (Shri Ramlala pranpratishtha) च्या शुभ प्रसंगी मी हा खरोखर ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये सामील होतो. आम्ही भाग्यवान आहोत आणि आमच्या आयुष्यात याचा साक्षीदार आहोत. #जयश्रीराम #जयश्रीराम #जयश्रीराम

अक्षय कुमार म्हणाला, श्री राम पुण्यतिथीच्या शुभदिनी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 🙏 जय श्री राम

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचे मुख्य पुजारी आहेत सोलापूरचे; छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे असे कनेक्शन)

बिगबी अमिताभ बच्चन यांनी केवळ भगवा झेंडा ट्वीट करून संदेश दिला.

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान मोदींच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचे उदाहरण बनली अयोध्या नगरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.