Mira Road मध्ये मिरवणुकीला गालबोट लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल

या हल्ल्यात ४ जण जखमी झाले असून २० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात दोन समुदायामध्ये तणाव निर्माण झाला होता.

752
Meera Road Crime : महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
Meera Road Crime : महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

पालघर जिल्ह्यातील मीरा रोड (Mira Road) येथील नयानगर या मुस्लिमबहुल वस्तीत काही समाजकटकांनी भगवे ध्वज लावलेल्या वाहनावर हल्ले केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात ४ जण जखमी झाले असून २० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात दोन समुदायामध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी नया नगर पोलिसांकडून अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Mira Road)

अयोध्येत सोमवारी होणाऱ्या श्री राममूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भगवे ध्वज आपल्या वाहनावर लावून श्री रामाचा जयघोष करण्यात येत होता. पालघर जिल्ह्यातील मीरा रोड (Mira Road) मधील नयानगर परिसरात देखील रविवारी रात्री भगव्या ध्वजासह श्रीरामच्या जयघोष करीत मिरवणुका निघालेल्या असताना या मिरवणुकीला काही समाजकंटकाकडून गालबोल लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Mira Road)

(हेही वाचा – Ayodhya Pran Pratishtha : शंकराचार्य यांनी बदलली भूमिका; म्हणाले…)

भगवे ध्वज लावून श्रीरामची जयघोष करणाऱ्या वाहनांना अडवून त्याच्यावर हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. जखमीमध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मध्यरात्री नया नगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमा अंतर्गत गुन्हा करण्यात आलेला आहे. (Mira Road)

पोलिसांकडून शांततेचे आवाहन

रविवारी झालेल्या वादाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर दिसून येऊ लागले आहेत. रविवारी मध्यरात्री अनेक तरुण भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यामुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान रविवारी किरकोळ आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वातावरण शांत ठेवावे, असे आवाहन नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केले आहे. (Mira Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.