Devendra Fadnavis: कारसेवकच नाही, तर शेकडो कोटी हिंदुंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक – देवेंद्र फडणवीस

रामलला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे, हा आमचा नारा होता. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी ढॉंचा खाली आला आणि तिथेच मंदिर तयार झाले.

170
Devendra Fadnavis: कारसेवकच नाही, तर शेकडो कोटी हिंदुंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: कारसेवकच नाही, तर शेकडो कोटी हिंदुंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक - देवेंद्र फडणवीस

माझ्यासाठी हा दिवस अतिशय भावनिक आहे. केवळ कारसेवकच नाही, तर शेकडो कोटी हिंदुंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली आहे. अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर त्यांनी कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले.

(हेही वाचा – Ayodhya Raam Mandir: श्रीराम मंदिरात स्थापन होणार सोन्याच्या पादुका, वाचा वैशिष्ट्यपूर्ण माहिती… )

७ हजार किलो शिऱ्याचा प्रसाद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोराडीच्या ऐतिहासिक मंदिरात प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी रामललाच्या आगमनाच्या निमित्ताने ७ हजार किलो शिऱ्याचा प्रसाद तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता जगातील सर्वात मोठी कढई तयार करण्यात आली असून तिला हनुमान कढई असे नाव देण्यात आले आहे. इथे प्रसाद तयार केल्यानंतर ही कढई अयोध्येला जाणार आहे आणि पुढील आठवड्यात तिथे प्रसाद तयार करण्याचा नवीन रेकॉर्ड केला जाईल.

आजचा दिवस माझ्यासाठी रामाचा आशीर्वाद !
माझ्यासाठी हा दिवस अतिशय भावनिक आहे. ज्या क्षणाकरिता संघर्ष केला, विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो, गोळ्या आणि लाठ्या काय असतात ते अनुभवलं तो क्षण आज याचि देही याची डोळा बघायला मिळणं, हा रामाचा आशीर्वाद असे ते म्हणाले.

आजचा दिवस ऐतिहासिक
यावेळी त्यांनी कारसेवकांच्या आठवणीही सांगितल्या. ते म्हणाले, रामलला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे, हा आमचा नारा होता. ६ डिसेंबर १९९२ला बाबरी ढॉंचा खाली आला आणि तिथेच मंदिर तयार झाले. त्यानंतर ‘रामलला हम आयेंगे , मंदिर भव्य बनाऐंगे’ हा आमचा नारा होता. केवळ कारसेवकच नाही, तर शेकडो कोटी हिंदुकरिता आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारताची नवीन अस्मिता आजपासून सुरू होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.