PM Narendra Modi : श्रीरामासाठी ११ दिवसांचे व्रत; हजारोंच्या साक्षीने सोडला उपवास

अयोध्येतील राम प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी झाला. या सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कठोर तप केले.आज हजारोंच्या साक्षीने त्यांनी व्रत सोडले.त्याबाबत गोविंद महाराज यांनी त्यांचे खूप कौतुक केले

207
PM Narendra Modi : श्रीरामासाठी ११ दिवसांचे व्रत; हजारोंच्या साक्षीने सोडला उपवास

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ११ दिवसांचे व्रत संपन्न झाले. गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते चरणामृत प्राशन करून मोदींनी हा उपवास सोडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हा उपवास त्यांनी केला होता. (PM Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३ जानेवारी पासून खास व्रत सुरु केलं होत. या व्रताचे गोविंद गिरी महाराजांनी कौतुक केलं. पंतप्रधांनानी स्वतःच अनुष्ठानाची नियमावली मागितली होती. तीन दिवसांच्या उपवासाचा पर्याय असतानाही त्यांनी तब्बल ११ दिवसाचा उपवास पूर्ण केला असंही त्यांनी म्हटलं.यावेळी बोलताना गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा क्षण पहायला मिळाला आहे. राम या देशाचा आत्मविश्वास आहे. देशात अशा प्रकारचं परिवर्तन आणण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन कार्य करावं लागत. हे कार्य पीएम मोदींनी केलं आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल)

आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून मोदी मिळाले हे देशाचे नाही तर संपूर्ण जागाच सौभाग्य आहे. त्यांचं मंगल हातानी आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हे स्वाभाविकच होत. पूर्ण ११ दिवस पंतप्रधानांनी अनुष्ठानाचे पालन केलं हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं, असही ते यावेळी म्हणाले.

गोविंदगिरी महाराजांनी केली शिवाजी महाराज यांच्या तपाची आठवण

गोविंदगिरी महाराज यांनी शिवाजी महाराज यांनी यांच्या तपाची आठवण करून दिली. शिवाजी महाराज यांनी सर्व धार्मिक परंपरा पूर्ण केल्या होत्या. शिवाजी महाहाराज एकदा श्रीशैलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला होता. त्यावेळी शिवाजी महाराज संन्यास घेण्याचे म्हणत होते. परंतु त्यांच्या सर्व मंत्र्यांनी त्यांना परत आणले. तसेच नरेंद्र मोदी यांना भगवती देवीने हिमालयातून पाठवले. त्यांना देशसेवेचे कार्य दिले. आपणास असा श्रीमंत योगी मिळाला आहे. असे यावेळी गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.