Shri Ramlala pratishthapana :  यापुढे अयोध्यामध्ये गोळ्यांचा आवाज नाही तर नामसंकीर्तन दुमदुमणार – योगी आदित्यनाथ

५०० वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आज भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाही. मन भावुक झाले आहे. देशातील प्रत्येक मार्ग श्रीरामजन्मभूमीच्या दिशेने येत आहे.

239
Shri Ramlala pratishthapana :  यापुढे अयोध्यामध्ये गोळ्यांचा आवाज नाही तर नामसंकीर्तन दुमदुमणार - योगी आदित्यनाथ

अयोध्येत उभारण्यात आलेले भव्य श्रीराम मंदिर हे राष्ट्र मंदिर (Shri Ramlala pratishthapana) आहे. निश्चिंत रहा, प्रभू श्रीरामाच्या कृपने अयोध्येच्या गल्लीत कुठेही कर्फ्यू लागणार नाही, बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येणार नाही, आता अयोध्या नामसंकीर्तनाने दुमदुमणार आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण रामराज्याची उद्घोषणा केली आहे. या रामराज्यात भेदभाव होणार नाही, सर्वांचा विकास केला जाईल, असे उद्बोधन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

(हेही वाचा – Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग)

भाव विभोर करणाऱ्या या क्षणासाठी ५ शतके गेली – 

अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीरामललाच्या मूर्तीची स्थापना (Shri Ramlala pratishthapana)  झाली, त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. ५०० वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आज भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाही. मन भावुक झाले आहे. देशातील प्रत्येक मार्ग श्रीरामजन्मभूमीच्या दिशेने येत आहे, प्रत्येक जीव राम राम जप करत आहे. असे वाटते आपण त्रेता युगात आहोत. आज प्रत्येक राम भक्तांमध्ये आनंदाचा भाव आहे. भाव विभोर करणाऱ्या या क्षणासाठी ५ शतके गेली. डझनभर पिढी यासाठी खपली. श्री रामजन्मभूमी जगात एकमेव उदाहरण असेल जिथे बहुसंख्यांकांना आपल्याच देवाच्या मंदिरासाठी विविध पातळीवर इतकी वर्षे संघर्ष करावा लागला. जेव्हा कोटी कोटी श्रद्धावंतांच्या त्यागाने हे स्वप्न पूर्ण झाले मंदिर वही बनाया है हा संकल्प साकार झाला आहे, असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले. (Shri Ramlala pratishthapana)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल)

भारताला एकात्मतेमध्ये बांधण्यासाठी हे मंदिर उदाहरण 

पंतप्रधान मोदी यांचे यानिमित्ताने अभिनंदन. आता गर्भगृहात वैदिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा (Shri Ramlala pratishthapana) झाली. रामललाची अलौकिक छबी आहे. धन्य आहे ते मूर्तिकार. यानिमित्ताने मला सर्व संत आणि आपल्या गुरूंचे स्मरण होत आहे ज्यांनी या मंदिरासाठी बलिदान दिले. संपूर्ण भारताला एकात्मतेमध्ये बांधण्यासाठी हे मंदिर उदाहरण आहे. या क्षणाचे आपण साक्षी बनलो आमची पिढी भाग्यवान आहे. आपल्याच भूमीवर सनातनी आस्था प्रताडीत होत गेली, पण भारतीय संस्कृती आपल्याला संयम शिकवते आणि त्यामुळे हे मंदिर उभे राहिले आहे. आज अयोध्येत त्रेता युगाची अनुभूती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पामुळे अयोध्येचा विकास झाला आहे. सांस्कृतिक, सक्षम, दिव्य, सुगम्य आणि भव्य अयोध्येच्या उभारणीसाठी हजारो कोटी खर्च केले जात आहे. विविध कुंडाचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण होत आहे. पुरातन संस्कृतीचे जतन होत आहे. सर्व संत, पर्यटक आणि जिज्ञासुंना आकर्षित करणारी ही नगरी बनवली जात आहे, असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले. (Shri Ramlala pratishthapana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.