- ऋजुता लुकतुके
भारतीय अ संघ विरुद्ध इंग्लंड लायन्स या अहमदाबाद इथं सुरू असलेल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज कोना भरतने शानदार नाबाद ११६ धावांची खेळी साकारली. ३ दिवसांतच भारतीय वरिष्ठ संघ हैद्राबादला इंग्लंडबरोबर कसोटी सामना खेळणार आहे. आणि या संघात कोना भरतची निवड झाली आहे. आणि अहमदाबादमधील कामगिरीमुळे आपोआपच भरतने संघातील जागेवर दावेदारी सांगितली आहे. (Ind vs Eng 1st Test)
भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स संघादरम्यानचा सामना मात्र बरोबरीत सुटला. चौथ्या डावात भारतीय एक संघासमोर जिंकण्यासाठी ४९० धावांचं आव्हान होतं. पण, भारतीय संघ पाच बाद ४२६ धावा करू शकला. आणि विजयासाठी त्यांना ६४ धावा कमी पडल्या. यात भरतने १६५ चेंडूंत नाबाद ११६ धावा केल्या. (Ind vs Eng 1st Test)
Match drawn 🤝
🏴 England Lions: 5️⃣5️⃣3️⃣/8️⃣d & 1️⃣6️⃣3️⃣/6️⃣d
🇮🇳 India A: 2️⃣2️⃣7️⃣ & 4️⃣2️⃣6️⃣/5️⃣🏅 POTM: Keaton Jennings
The Lions are held to a draw in Ahmedabad after an unbeaten 116 from KS Bharat 💯 pic.twitter.com/mPWdSyOBOC
— England Cricket (@englandcricket) January 20, 2024
(हेही वाचा – Shri Ramlala pranpratishtha : अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठानिमित्ताने सोशल मीडियात काय आहेत भावना?)
यष्टीरक्षण करणं हे जबाबदारीचं काम
कोना भरतच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव असल्याचं नेहमी बोललं जातं. म्हणूनच भारतीय संघातही तो आपलं स्थान राखू शकलेला नाही. पण, इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानात खेळताना भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांना खेळवेल अशीच चिन्हं आहेत. आणि अशावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना के एल राहुलकडे यष्टीरक्षणाची धुरा देऊन त्याला दमवायचं नाही. कारण, फिरकी गोलंदाजांना भारतात यष्टीरक्षण करणं हे जबाबदारीचं काम आहे. त्यात कसरतही खूप आहे. (Ind vs Eng 1st Test)
राहुल नसेल तर भारतीय संघ प्रशासनाची पसंती कोना भरतलाच आहे. आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध शतक झळकावून त्याने दावेदारीही मजबूत केली आहे. ३० वर्षीय भरत आतापर्यंत भारतासाठी ५ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात त्याने १८ च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळेच त्याचा नंतर संघ निवडीसाठी विचार झाला नाही. आणि त्याची जागा रिषभ पंत आणि पुढे इशान किशनने घेतली. (Ind vs Eng 1st Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community