CM Eknath Shinde : रक्तांच्या नातेवाईकाला विसर, विचारांच्या वारसदाराकडून बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तींचे स्मरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरासह संपूर्ण मुंबईतील अनेक भागांमध्ये श्री राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे कटआऊट प्रदर्शित केले. या कट आऊटवर मुख्यमंत्र्यांनी, ‘राखला गेला अखेर बाळासाहेबांच्या इच्छेचा आणि करोडो राम भक्तांचा मान... जय श्री राम!’ अशाप्रकारचा संदेश शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देत एकप्रकारे उबाठा शिवसेनेवर कुरघोडी करण्याची नामी संधी दवडली नाही. 

741
CM Eknath Shinde : रक्तांच्या नातेवाईकाला विसर, विचारांच्या वारसदाराकडून बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तींचे स्मरण
CM Eknath Shinde : रक्तांच्या नातेवाईकाला विसर, विचारांच्या वारसदाराकडून बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तींचे स्मरण

आपला पक्ष आणि वडिलांचे नाव पळवले म्हणून असा आरोप आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांच्या राममंदिराच्या स्वप्न पूर्तीचा विसर पडला, त्याचवेळी बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नपूर्तीचे स्मरण करून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरासह संपूर्ण मुंबईतील अनेक भागांमध्ये श्री राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या छायाचित्रांचे कटआऊट प्रदर्शित केले. या कट आऊटवर मुख्यमंत्र्यांनी, ‘राखला गेला अखेर बाळासाहेबांच्या इच्छेचा आणि करोडो राम भक्तांचा मान… जय श्री राम!’ अशाप्रकारचा संदेश शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देत एकप्रकारे उबाठा (UBT) शिवसेनेवर कुरघोडी करण्याची नामी संधी दवडली नाही. (CM Eknath Shinde)

New Project 2024 01 22T165115.244

अयोध्येतील मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना सोमवारी पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारत देश राममय झाला असून प्रत्येकाच्या मुखी जय श्री रामाचा जयघोष होत होता. आसमंत जय श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमून निघालेला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरासह मुंबईतील अनेक भागांमध्ये श्री राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या छायाचित्रांचे कटआऊट प्रदर्शित केले. धनुर्धारी राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या छायाचित्रांची मोठी कट आऊट्स छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील सर्व रस्त्यांवर दोन्ही बाजुंनी तसेच मुंबईतील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर अशाप्रकारचे शेकडो फलक लावण्यात आले आहे. या कट आऊटवर मुख्यमंत्र्यांनी, ‘राखला गेला अखेर बाळासाहेबांच्या इच्छेचा आणि करोडो राम भक्तांचा मान…चला जाऊ अयोध्याला, बोलाsss जय श्री राम!’ अशाप्रकारचा संदेश दिला आहे. तसेच बाळासाहेबांचे स्वप्न साकार अशा आशयाचेही फलक लावण्यात आले आहे. हे सर्व फलक लक्ष जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. (CM Eknath Shinde)

New Project 2024 01 22T165214.657

(हेही वाचा – Shri Ramlala pratishthapana :  यापुढे अयोध्यामध्ये गोळ्यांचा आवाज नाही तर नामसंकीर्तन दुमदुमणार – योगी आदित्यनाथ)

अयोध्येत राम मंदिर बनले जावे ही शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेबांची इच्छा तथा स्वप्न होते. ते आज प्रत्यक्षात साकार होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या या स्वप्नपूर्तीची आठवण शिवसेना उबाठाला झाली नाही. परंतु बाळासाहेबांच्या इच्छेचा मान राखत हे मंदिर उभारले गेले याची आठवण शिवसेनेचे मुख्यनेता तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेला करून दिली आहे. (CM Eknath Shinde)

New Project 2024 01 22T165326.020

पार्कातील स्मृतीस्थळाशेजारील जागेत ‘आठवण साहेबांची’

छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जिथे बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले होते, त्या स्मृती स्थळाच्या शेजारील जागेमध्ये एक मोठे बॅनर लावण्यात आले आहे. आठवण साहेबांची अशा आशयाचे बॅनर स्वरुपात कटआऊट लावण्यात आले आहे, ज्यावर ह्या डोळ्यांन पाहिलेले स्वप्न साकार, असे म्हटले आहे. राजेश चिंदरकर यांनी लावलेल्या बॅनरवर श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे हे फलक बाळासाहेबांच्या पार्कातील अंतिम संस्काराच्या जागेवर लावण्यात आले आहे. (CM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.