भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटींतून माघार घेतली आहे. बीसीसीआयनेच सोमवारी (२२ जानेवारी) संध्याकाळी ही बातमी उघड केली. आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विराट का खेळत नाही यावर अनावश्यक चर्चा टाळण्याचं आवाहन मीडिया आणि चाहत्यांना केलं आहे. (Ind vs Eng 1st Test )
विराटने कसोटीतून माघार घेण्यापूर्वी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड तसंच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केली आहे, असं बीसीसीआयच्या पत्रकात म्हटलं आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे विराट माघार घेत असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. (Ind vs Eng 1st Test )
‘विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या आयडीएफसी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी न खेळण्यासाठी बोर्डाची परवानगी मागितली होती. वैयक्तिक कारणांमुळे तो कसोटी खेळू इच्छित नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी विराटने कर्णधार रोहीत शर्मा आणि संघ प्रशासनाशी चर्चा केली होती,’ असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
(हेही वाचा : Ind vs Eng 1st Test : इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध शतक झळकावत कोना भरतचा कसोटीसाठी सज्ज असल्याचा दावा)
राष्ट्रीय संघासाठी खेळणं या गोष्टीला विराट नेहमीच प्राधान्य देत आला आहे. पण, सध्या घरातील एका महत्त्वाच्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी त्याला पहिल्या दोन कसोटीतून माघार घ्यावी लागत असल्याचं समजतंय. अलीकडेच अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला टी-२० सामनाही विराट घरगुती कारणांमुळे खेळला नव्हता.बीसीसीआयकडून विराट ऐवजी बदली खेळाडू दिला जाईल, अशी शक्यता आहे. इंग्लंड विरुद्धची पहिली कसोटी २५ जानेवारीला हैद्राबाद इथं सुरू होत आहे. तर दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून बिशाखापट्टणम इथं रंगणार आहे.
हेही पहा –