Disha Salian प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक होणार?

साडेतीन वर्षापूर्वी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान या दोघांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी एसआयटी तपास सुरु आहे.

434
तो प्रत्येक पालकमंत्र्यांचा अधिकारच, Aditya Thackeray यांनी दिली कबुली

साडेतीन वर्षापूर्वी बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) या दोघांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी एसआयटी (SIT) तपास सुरु आहे. या तपासाची सुई शिवसेना उबाठा गटाचे (Shiv Sena UBT group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दिशेने जात असल्याचे दिसत असतानाच आदित्य यांना लवकरच अटक होणार, असे संकेत भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी दिले. (Disha Salian)

चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SSR) याच्या चाहत्यांच्या गटाने आयोजित केलेल्या समाजमाध्यमावरील (Social Media) एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) बोलत होते. या सत्राला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून जवळपास दीडशेहून अधिक चाहते यात सहभागी (participated) झाले होते, तर २,२०० हून जास्त नेटकऱ्यांनी हे सत्र पाहिला (views) आहे. (Disha Salian)

संयम ठेवण्याचा सल्ला

राणे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देत SSR च्या चाहत्यांना थोडा संयम ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच SIT कडून तपास योग्य दिशेने सुरु असून या दोन्ही प्रकरणात SSR चाहत्यांना न्याय (justice) मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “मला कल्पना आहे की, या प्रकरणात SSR चाहत्यांच्या भावना तीव्र आहेत. पण विश्वास ठेवा, आता SIT मध्ये एखाद-दूसरा अधिकारी सोडला तर बाकी सगळे तपास अधिकारी निष्पक्ष असून योग्य दिशेने तपास सुरू आहे. जे अधिकारी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) अपेक्षेप्रमाणे काम करत आहे, त्यांना SIT मधून काढून टाकण्याची मागणी मी SIT प्रमुखांकडे केली आहे.” (Disha Salian)

(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

लवकरच ‘ते’ गजाआड असतील

एका चाहत्याने नितेश यांना प्रश्न करत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे अंगुली निर्देश केला. तसेच ते अजूनही दुबई तसेच अन्य ठिकाणी पार्ट्यांना हजेरी लावत फिरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राणे यांनी सांगितले की, “मी तुमच्या भावना समजू शकतो. पण आता जी तुम्ही नावे घेतली ते जास्त काळ अशा पार्ट्यांना हजेरी लावू शकणार नाहीत किंवा दुबईला जाऊ शकतील, असे नाही. कायदा संगळ्याचं उत्तर देईल आणि जे कोण राजपूत आणि दिशा सलियान प्रकरणात दोषी आहेत, त्यांच्यावर कायद्याने कारवाई होणार आणि लवकरच ते गजाआड असतील. तपास यंत्रणांकडे तुम्ही उल्लेख केलेल्या नावांची माहिती आहे.” (Disha Salian)

दोन्ही प्रकरणे एकमेकांत गुंतलेली

ते पुढे म्हणाले, “सध्या माझा फोकस हा दिशा सालियान प्रकरणावर आहे. कारण एक क्रोनोलॉजी समजून घ्या. दिशा सलियान प्रकरणात जे दोषी आहेत, तेच राजपूत प्रकरणास जबाबदार आहेत. त्यामुळे दिशा आणि राजपूत ही दोन्ही प्रकरणे एकमेकांत गुंतलेली आहेत. मी या प्रकरणांचा पाठपुरावा करतो आहे. त्यामुळे काही गोष्टी मला समजल्या, त्यावरून मी सांगतो आहे. शेवटी सत्य बाहेर येईलच. तोवर थोडा संयम राखा,” असेही राणे यांनी स्पष्ट केले. (Disha Salian)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.