अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात राममय वातावरण निर्माण झाले असून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात भजन व महाआरतीचे आयोजन केले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. (Shri Ramlala Pranpratishtha)
पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..!
अयोध्येत प्रभु श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या पावन दिनाचे औचित्य साधून ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भजन व प्रभू श्री… pic.twitter.com/ulGIWyALPt
— Anand Paranjpe (@paranjpe_anand) January 22, 2024
कलाकारांची भजन संध्या
यावेळी ठाण्यातील शांतीनगर येथील बुवा कृष्णा प्रभाकर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष मोतिराम सावंत व प्रथमेश सावंत यांच्या उपस्थितीत मंडळाच्या कलाकारांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. पखवाज-स्वप्नील सावंत, तबला वेदांशू बटवाव व अनिकेत दळवी, झांज-अजित साकटकर, कोरस- प्रशांत पेडणेकर, संतोष शिरसाट, नामदेव रेवडेकर, प्रथमेश सावंत, प्रतिक वाळके, स्वराज शिरसाट आदी कलाकारांनी साथ देत या भजनात रंग भरला. (Shri Ramlala Pranpratishtha)
(हेही वाचा – Mohan Bhagwat : जगाला शोकांतिकेतून दिलासा देणारा नवा भारत उभा राहील, राम मंदिर त्याचे प्रतीक – मोहन भागवत)
रांगोळीची भव्य आरास
यावेळी ठाणे मध्यवर्ती कार्यालयाबाहेर रांगोळीची भव्य आरास करण्यात आली होती. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करुन आणि प्रभू श्री रामाचा जयजयकार करत प्रभू श्री राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. (Shri Ramlala Pranpratishtha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community