MCGM Bridge : छत्रपती शिवाजी टर्मिनस भुयारी मार्गाची होणार डागडुजी

कुलाबा ते भायखळा या दक्षिण मुंबईतील पुलांचे सर्वेक्षण करून ए विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्ग, मेट्रो भुयारी मार्ग, वाय. एम. पूल, अर्देशिर इराणी अर्थात केनेडी पूल, सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पूल, ग्रँटरोड येथील रस्ता पूल, ग्रँट रोड येथील स्पेंटा पूल भायखळा एस पूल या सात पुलांची दुरूस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

329
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील भुयारी मार्गाचा कायापालट करून त्याचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. मात्र, या भुयारी मार्गाच्या मोठ्या स्वरुपातील दुरुस्तीसह दक्षिण मुंबईतील इतर सहा पुलांची किरकोळ दुरुस्ती केली जाणार असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (MCGM Bridge)

कुलाबा ते भायखळा या दक्षिण मुंबईतील पुलांचे सर्वेक्षण करून ए विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्ग, मेट्रो भुयारी मार्ग, वाय. एम. पूल, अर्देशिर इराणी अर्थात केनेडी पूल, सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पूल, ग्रँटरोड येथील रस्ता पूल, ग्रँट रोड येथील स्पेंटा पूल भायखळा एस पूल या सात पुलांची दुरूस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिकेच्यावतीनेत तब्बल पावणे सात कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी डी बी इन्फ्राटेक या कंपनीची निवड केली आहे. (MCGM Bridge)

विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्गाच्या नुतनीकरणासह अनेक पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने घेण्याची मागणी होत होती. त्याबरोबरच सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत होती. परंतु पादचारी पुल तसेच रेल्वे पूल आदी ठिकाणी सरकते जिने बसवयाची मागणी होत आहे. रेल्वे स्थानक ते सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पूलावर हे सरकते जिने बसवण्याची मागण होऊनही रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. या पुलाचा वापर अनेक व्यावसायिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून केला जातो. त्यामुळे या पुलावर सरकते जिने बसवले जावेत यासाठीच्या कामांचा यामध्ये समावेश झालेला दिसत नसल्याने रहिवाशी तसेच प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (MCGM Bridge)

(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : इंग्लंडची बॅझबॉल रणनीती काय आहे? भारता विरुद्ध ती यशस्वी होईल का?)

या पुलांची होणार दुरुस्तीची कामे
  • ए विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्ग
  • मेट्रो भुयारी मार्ग
  • वाय. एम. पूल
  • अर्देशिर इराणी अर्थात केनेडी पूल
  • सैफी हॉस्पिटल येथील पादचारी पूल
  • ग्रँटरोड येथील रस्ता पूल
  • ग्रँट रोड येथील स्पेंटा पूल
  • भायखळा एस पूल

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.