अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते सोमवारी (२२ जानेवारी) श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली. राज्यपाल बैस (Governor Ramesh Bais) यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला. (Ramesh Bais)
राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती. साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. (Ramesh Bais)
(हेही वाचा – Ram Mandir Pranpratistha: राममंदिर भूमिपूजन ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सव्वा लाख वेळा शंखवल्लभ यांनी केला शंखनाद)
राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल (Governor Ramesh Bais) व रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला. श्री राम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस (Governor Ramesh Bais) यांचे कुटुंबिय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांना कौतुकाची थाप दिली. (Ramesh Bais)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community