Asian Marathon 2024 : आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा मान सिंग दुसरा भारतीय ॲथलीट

मॅरेथॉन जिंकण्याबरोबरच मान सिंगने आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली

282
Asian Marathon 2024 : आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा मान सिंग दुसरा भारतीय ॲथलीट
ऋजुता लुकतुके

भारतात रविवारी मुंबई मॅरेथॉनची धूम असताना हाँग काँगमध्ये भारताचा मान सिंग एक ऐतिहासिक कामगिरी करत होता. तिथे रंगलेल्या आशियाई मॅरेथॉन विजेतेपद स्पर्धेत मान सिंगने सुवर्ण पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारा मान सिंग हा फक्त खरा भारतीय आहे.( Asian Marathon 2024 )

त्याचबरोबर मानसिंगने आपली सर्वोत्तम वेळही इथं नोंदवली. ३० वर्षीय मानसिंगने ४२ किलोमीटरचं अंतर २ तास १४ मिनिटं आणि १९ सेकंदांत पूर्ण केलं. त्याची आधीची सर्वोत्तम वेळ २ तास १६ मिनिटं आणि ५८ सेकंदं इतकी होती. गेल्यावर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये त्याने ही वेळ नोंदवली होती. पण, आता त्याने तब्बल २ मिनिटांनी आपली कामगिरी सुधारली आहे. ( Asian Marathon 2024 )

या स्पर्धेत चीनच्या युआंग याँगझेंगला रौप्य पदक मिळालं. किरगिझस्तानच्या तियापकिन इलियाने कांस्य पदक जिंकलं. मानसिंगचा भारतीय सहकारी बेलिअप्पाला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्याने २ तास २० मिनिटं आणि २० सेकंदांचा वेळ दिला.

(हेही वाचा : Ind vs Eng 1st Test : इंग्लंडची बॅझबॉल रणनीती काय आहे? भारता विरुद्ध ती यशस्वी होईल का?)

महिला विभागात अश्विनी जाधव नववी तर ज्योती गवाटे अकरावी आली. मानसिंग आशियाई स्पर्धेत अव्वल आला असला तरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तो पात्र ठरू शकला नाही. कारण, तिथली पात्रता निकष २ तास ८ मिनिटांची आहे. आणि त्यासाठी मानसिंगला आणखी सहा मिनिटांचा अवधी कमी करावा लागणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या होआंगझाओ आशियाई खेळांमध्ये मानसिंग आठवा आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.