- ऋजुता लुकतुके
इंग्लिश क्रिकेट संघ रविवारी रात्री पहिल्या कसोटीसाठी हैद्राबादमध्ये पोहोचला. दोन्ही संघांदरम्यान पाच कसोटी सामन्यांची ही मोठी मालिका होणार आहे. पहिली कसोटी २५ जानेवारीला हैद्राबादमध्ये आहे. तर शेवट धरमशाला इथं ११ फेब्रुवारीला होणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने या मालिकेला खूप महत्त्व आहे. (Ind vs Eng 1st Test)
इंग्लिश संघासाठी या मालिकेला जास्त महत्त्व आहे. कारण, एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांची ही पहिली मोठी कसोटी मालिका आहे. विश्वचषकात इंग्लिश संघाला तळाच्या संघांमध्ये राहावं लागलं होतं. भारतात या संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. आणि अगदी बांगलादेश, अफगाणिस्तानच्या संघांनीही त्यांना हरवलं होतं. त्यानंतर इंग्लिश संघ पुन्हा एकदा भारतात खेळण्यासाठी आला आहे. (Ind vs Eng 1st Test)
#WATCH | Telangana: England cricket team players arrived at Rajiv Gandhi International Airport, Hyderabad, for the 5-match Test series.
The first Test is scheduled to be played from January 25 at the Rajiv Gandhi International Stadium. (21.01) pic.twitter.com/y7YDnzjtQw
— ANI (@ANI) January 21, 2024
(हेही वाचा – Shri Ramlala Pranpratishtha निमित्त आनंद परांजपे यांनी ठाण्यात केली महाआरती)
इंग्लिश संघ कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देत आला आहे. त्यामुळेच एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जून २०२३ पर्यंत इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाबरोबरची ॲशेस मालिका खेळत होता. पण, भारतीय वातावरणात खेळणं संघासाठी सोपं जाणार नाही. (Ind vs Eng 1st Test)
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली हा संघ भारतात आला आहे. भारतात येण्यापूर्वी इंग्लिश संघाने संयुक्त अरब अमिरातीत सराव केला आहे. जोस बटलर, जो रुट आणि ख्रिस वोक्स, लिअम डॉसन आणि ओली पोप यांच्याकडे फलंदाजीची धुरा असेल. जॉनी बेअरस्टो किंवा बेन फोक्स यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. आणि जिमी अँडरसन बरोबरच गस ॲटकिनसन, मार्क वूड आणि ओली रॉबिनसन हे तेज गोलंदाज असतील. (Ind vs Eng 1st Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community