Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा

Babri slogans at Jamia Millia : जामिया मिलियामध्ये निदर्शनांचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापिठाच्या बाहेर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

449
Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा
Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा

अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत असतांना दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात (Jamia Millia Islamia University) बाबरीच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. ‘बाबरीसाठी संप’ (Strike for Babri) अशा घोषणा काही विद्यार्थी देत होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Babri slogans at Jamia Millia)

(हेही वाचा – Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात; मंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन)

देशभरात राममंदिराचा (Ayodhya Rammandir) आनंद साजरा होत असतांना जामिया मिलियामध्ये अशा प्रकारे घोषणाबाजी झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठाबाहेर पोलीसफाटा तैनात करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

निदर्शने करण्याची तयारी होती – पोलीस

या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने जामिया मिलियामध्ये निदर्शनांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापिठाच्या बाहेर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. राममंदिरातील (Ayodhya) प्रतिष्ठापना सोहळा आणि आगामी प्रजासत्ताक दिन (Republic Day) लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापिठाच्या परिसरात निदर्शने आयोजित करण्यात आली होती, असे दिसते. पण अद्याप तरी वेगळे काही घडलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir Consecration : अयोध्येत राम मंदिराच्या निमित्ताने २२ टक्के नोकऱ्या वाढणार)

विद्यापीठ दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद

पोलीस अधिकारी पुढे म्हणाले की, या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र या घोषणाबाजीनंतर (Babri slogans) अयोध्येतील राममंदिराच्या सोहळ्याच्या ऐतिहासिक प्रसंगी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिस्थिती नियंत्रणात – विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

जामिया मिलिया इस्लामिया प्रशासनाने मात्र सांगितले की, आंदोलनामुळे शैक्षणिक उपक्रम विस्कळीत झालेले नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आहे. केवळ दोन ते तीन विद्यार्थी घोषणाबाजी करत होते. वर्ग आणि परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिल्या. (Babri slogans at Jamia Millia)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.