Ind vs Eng 1st Test : भारतीय कर्णधार रोहित शर्माने कसोटी मालिकेसाठी कशी तयारी करतोय?

Ind vs Eng 1st Test : रोहित शर्माच्या नेट सत्राचे काही फोटो त्याचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सनी जारी केले आहेत.

185
Ind vs Eng 1st Test : भारतीय कर्णधार रोहित शर्माने कसोटी मालिकेसाठी कशी तयारी करतोय?
Ind vs Eng 1st Test : भारतीय कर्णधार रोहित शर्माने कसोटी मालिकेसाठी कशी तयारी करतोय?

ऋजुता लुकतुके

भारतीय संघासमोरचं पुढील मोठं आव्हान आहे ते इंग्लंड बरोबरची पाच कसोटींची मालिका. (Ind vs Eng 1st Test) दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) कसोटी मालिका सगळं मिळून पाच दिवस चालली. त्यामुळे भारतीय संघासमोर आता खरी कसोटी आहे. आणि त्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या सज्ज होत आहे. २५ तारखेला हैद्राबादला पहिली कसोटी सुरू होत आहे.

(हेही वाचा – Kerala CM On Ram Mandir : केरळच्या मु्ख्यमंत्र्यांना राममंदिराचा पोटशूळ; म्हणे, धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा पुसट होत आहे)

रोहित मुंबईत सराव करतानाचे काही फोटो रोहितची आयपीएल फ्रँचाईजी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कसोटीत ६६.७३ धावांच्या सरासरीने २००२ धावा

रोहित शर्माची इंग्लिश संघासमोरची कसोटीतील कामगिरी उल्लेखनीय आहे. ९ कसोटींत ४९ धावांच्या सरासरीने रोहितने ७४७ धावा केल्या आहेत. यात २ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. अख्ख्या कारकीर्दीचा विचार करता, रोहितने भारतीय खेळपट्ट्यांवर झालेल्या कसोटीत ६६.७३ धावांच्या सरासरीने २००२ धावा केल्या आहेत. यात ८ शतकं आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

पहिल्या २ कसोटींसाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडेच

इंग्लंड (England) विरुद्धच्या पहिल्या २ कसोटींसाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडेच आहे. आणि जसप्रीत बुमरा संघाचा उपकर्णधार आहे. रोहित, शुभमन, यशस्वी, विराट, राहुल, श्रेयस अशी मोठी फलंदाजांची फळी भारताकडे आहे. तर अश्विन, जाडेजा हे दोघं अष्टपैलू खेळाडू असतील. राहुल, कोना भरत आणि नवोदित ध्रुव जुरेल असे तीन यष्टीरक्षणाचे पर्याय भारताकडे असतील.

(हेही वाचा – Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात; मंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन)

तेज गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमरा आणि महम्मद सिराज उचलतील. त्यांच्याबरोबर आवेश खान आणि मुकेश कुमार यांचाही संघात समावेश आहे. तर फिरकीची धुरा अश्विन, जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्याकडे असेल. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.