सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामललाचा ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा (Ayodhya Shri Ram Mandir) संपन्न झाला. त्यानंतर आज पासून म्हणजेच मंगळवार २३ जानेवारीपासून सर्व सामान्य भाविकांसाठी मंदिराची दारं उघडली आहेत. याच पार्श्वभूमीवर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रार्थना करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली. प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर पहिल्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून श्री रामललाची पूजा आणि दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले.
(हेही वाचा – Kerala CM On Ram Mandir : केरळच्या मु्ख्यमंत्र्यांना राममंदिराचा पोटशूळ; म्हणे, धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा पुसट होत आहे)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली प्राण प्रतिष्ठा (Ayodhya Shri Ram Mandir) सोहळ्याचे मुख्य विधी केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील उपस्थित होते. अयोध्येतील हा ऐतिहासिक प्रसंग लाखो भक्तांनी अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी कमळाच्या फुलाने राम लल्लाची पूजा केली.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: Heavy rush outside the Ram Temple as devotees throng the temple to offer prayers and have Darshan of Shri Ram Lalla on the first morning after the Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/gQHInJ5FTz
— ANI (@ANI) January 23, 2024
(हेही वाचा – Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, अनेक जण अडकल्याची भीती)
या मंदिराला एक लाखाहून अधिक भाविक (Ayodhya Shri Ram Mandir) भेट देतील असा अंदाज मंदिराच्या ट्रस्टने वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन सकाळी ७ ते रात्री ११:३० आणि त्यानंतर दुपारी २ ते संध्याकाळी ७ पर्यंत करता येईल. (Ayodhya Shri Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community