वीर सुरेंद्र साई (Veer Surendra Sai) यांचा जन्म २३ जानेवारी १८०९ रोजी ओडिशातील संबलपूरच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर असलेल्या खिंडा या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धर्मसिंह. हे कुटुंब संबलपूर राज्याच्या शासक कुळातले. वीर सुरेंद्र साई हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते खूप चांगले तलवारबाज होते. संबलपूर (Sambalpur) राज्याचे कायदेशीर वारस म्हणून ब्रिटिशांनी त्यांचा अस्वीकार केला तेव्हा त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला.
(हेही वाचा – OnePlus 12 Series Launch : वन प्लस १२ सीरिजमधील फोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि बॅटरीचं आयुष्य याविषयी जाणून घेऊया)
वयाच्या १८ व्या वर्षी ब्रिटीशांच्या विरोधात
ब्रिटीश सैन्याशी झालेल्या चकमकीत सुरेंद्र साई, त्यांचे भाऊ उदयंता साई आणि त्यांचे काका बलराम सिंह यांना पकडण्यात आले आणि त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठवण्यात आले. तुरूंगातच बलराम सिंह यांचा मृत्यू झाला. १८२७ मध्ये त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ब्रिटीशांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली.
१८६२ मध्ये आत्मसमर्पण
१८४० मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि हजारीबाग तुरुंगात पाठवण्यात आले. १८५७ च्या बंडाच्या वेळी त्यांना हजारीबाग तुरुंगातून सैनिकांनी बाहेर काढले. मग ओडिशाच्या डोंगराळ भागातून क्रांतिकार्य करु लागले आणि मात्र १८६२ मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केले.
(हेही वाचा – Dolarai Mankad : सौराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु साहित्यिक डोलाराय मांकड)
१८८४ मध्ये तुरुंगात निधन
त्याआधी ते १७ वर्षे तुरुंगात होते. जेव्हा त्यांनी आत्मसमर्पण केले तेव्हा त्यांनी २० वर्षांची शिक्षा भोगली. २३ मे १८८४ मध्ये त्यांचे तुरुंगात असताना निधन झाले. भारतावर ब्रिटिशांचे शासन असले, तरी काही भागांवर त्यांना शासन करायला विलंब झाला. त्यापैकी एक म्हणजे संबलपूर. कारण वीर सुरेंद्र साई यांनी प्रखर लढा दिला. तिथले लोक त्यांना बीर म्हणतात. बीर म्हणजेच वीर… वीर सुरेंद्र साई… (Veer Surendra Sai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community