भारतातील ‘हिंदुत्व’ विचारसरणीच्या वाढत्या लहरीमुळे जातीय सलोखा आणि प्रादेशिक शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतातील वाढत्या इस्लामोफोबिया, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांची दखल घेतली पाहिजे. इस्लामिक वारसास्थळांचे (Islamic Heritage) अतिरेकी गटांपासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण आपली भूमिका बजावली पाहिजे”, असे ट्वीट पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. (Pakistan on Ayodhya Ram mandir)
(हेही वाचा – Veer Surendra Sai : ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणारे महान क्रांतिकारक वीर सुरेंद्र साई)
देशभरात सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भारतातच नव्हे, तर जगभरात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे जगभर जल्लोष चालू असतांना पाकिस्तानचा मात्र जळफळाट झाला आहे.
राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Rammandir) सोहळा पार पडल्यानंतर काही तासांत पाकिस्तानने थयथयाट केला आहे.
🔊: PR NO. 2️⃣4️⃣/2️⃣0️⃣2️⃣4️⃣
Pakistan Condemns Consecration of the ‘Ram Temple’ on the Site of Demolished Babri Mosque
🔗⬇️https://t.co/s3zJmZMhzN pic.twitter.com/X5rYshPxDu
— Spokesperson 🇵🇰 MoFA (@ForeignOfficePk) January 22, 2024
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा निषेध करतो
पाकिस्तानच्या (Pakistan) परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी एक्स (X) या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील प्रसिद्धीपत्रकात राममंदिराच्या निमित्ताने भारतावर टीका केला आहे. “भारतातील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याजागी बांधण्यात आलेल्या राममंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो”, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे.
(हेही वाचा – Ranjit Savarkar : लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना – रणजित सावरकर )
लोकशाही चेहऱ्याला काळा डाग
“अयोध्येत मशीद होती, त्या जागेवर मंदिर बांधल्यामुळे भारताच्या लोकशाही चेहऱ्याला काळा डाग लागला आहे. विशेष म्हणजे, यानंतर आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद (Gnanavapi Case) आणि मुथरेतील शाही ईदगाह मशिदीचाही आता नंबर लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही यादी वाढतच जात आहे. या मशिदींनाही विनाशाचा सामना करावा लागणार आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाने या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Pakistan on Ayodhya Ram mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community