Manoj Jarange Wax Statue : वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा

444
Manoj Jarange Wax Statue : वॅक्स म्युजियममध्ये मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा
Manoj Jarange Wax Statue : वॅक्स म्युजियममध्ये मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा

राज्यातच नाही तर सध्या देशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जोरदार चर्चा आहे. एकीकडे मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट येणार आहे, तर आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा सिलिब्रेटीप्रमाणे मेणाचा पुतळा साकारला गेला आहे.

(हेही वाचा – Balasaheb Thackeray Birth Anniversary : पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली)

लोणावळ्यात चौथा मुक्काम

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ परिसरात एकविरा कार्ला येथे वॅक्स मूजियम आहे. याच म्युझियममध्ये मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) लढणारे मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे. मावळ तालुक्यातील कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तीन महिन्यांत साकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ranjit Savarkar : लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना – रणजित सावरकर)

मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे. मावळ तालुक्यातील अशोक माळसकर यांनी हा पुतळा उभारला आहे. (Manoj Jarange Wax Statue)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.