Ayodhya Ram mandir : 15 किलो सोने, 18 हजार हिरे आणि पाचू… रामलल्लाचे दागिने बनवले केवळ 12 दिवसांत

232
Ram Mandir: रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू, काय आहेत नवीन नियम? वाचा सविस्तर...
Ram Mandir: रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी नवीन व्यवस्था लागू, काय आहेत नवीन नियम? वाचा सविस्तर...

22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेने 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. (Ayodhya Ram mandir) जगभरातील लाखो भाविक वर्षानुवर्षे या क्षणाची वाट पाहत होते. रामलल्ला आता त्याच्या दिव्य-वैभवशाली रूपासह सर्वांसमोर आहे. पौराणिक कथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे रामलल्लाची मूर्ती अनेक दैवी वस्त्रालंकारांनी सुशोभित केली आहे.

(हेही वाचा – Dolarai Mankad : सौराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरु साहित्यिक डोलाराय मांकड)

रामलल्लाचे अलंकार अध्यात्म रामायण, श्रीमद वाल्मिकी रामायण (Valmiki Ramayana), श्रीरामचरितमानस (Shriramcharitmanas) आणि आलवंदर स्तोत्र (Alavandar Stotram) यांचे संशोधन आणि अभ्यास करून बनवले आहेत. अलंकार या तीनही स्तोत्रांमध्ये वर्णन केल्यानुसार हे वस्त्रालंकार बनवले गेले आहेत. रामलल्लाचे दागिने बनवण्यासाठी 15 किलो सोने आणि सुमारे 18 हजार हिरे आणि पाचू वापरण्यात आले आहेत. तिलक, मुकुट, 4 हार, कंबरपट्टा, पैंजणाच्या दोन जोड्या, विजय माला, दोन अंगठ्यांसह एकूण 14 दागिने तयार करण्यात आले आहेत. हे दागिने केवळ 12 दिवसांत तयार केले गेले आहेत.

हे दागिने तयार करण्याची जबाबदारी लखनौच्या हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्सकडे सोपवण्यात आली होती. रामलल्लाच्या मुकुटात प्रथम सूर्याची प्रतिमा तयार केली गेली; कारण प्रभु श्रीराम हे सूर्यवंशी होते. पाचू हे राजशक्तीचे प्रतीक असलेले रत्न मुकुटाच्या मध्यभागी आहे. प्रभु श्रीरामाचा मुकुट राजाच्या मुकुटाप्रमाणे तयार न करता 5 वर्षांच्या मुलाच्या पगडीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. मुकुटावर मत्स्य, मोर अशी चिन्हे आहेत. (jewels of ram lalla)

(हेही वाचा – Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा)

रामललाच्या दागिन्यांचे वैशिष्ट्य
मुकुट

रामलल्लाचा मुकुट 1 किलो 700 ग्रॅम सोन्याचा बनलेला आहे, ज्यामध्ये 75 कॅरेट हिरा, सुमारे 175 कॅरेट झांबियन एमेराल्ड पाचू, सुमारे 262 कॅरेट माणिक लावले गेले आहेत. मुकुटच्या मध्यभागी भगवान रामाच्या सूर्यवंशाचे प्रतीक असलेला सूर्यनारायण विराजमान आहे. मुकुटातील हिरे शुद्ध आणि शेकडो वर्षे प्राचीन आहेत. जे शुद्धता आणि सत्यतेचे प्रतीक आहेत. मुकुटाचा मागचा भाग 22 कॅरेट सोन्याचा बनलेला आहे आणि त्याचे वजन सुमारे 500 ग्रॅम आहे.

तिलक

रामलल्लाचा तिलक भगवान 16 ग्रॅम सोन्याचा आहे. त्याच्या मध्यभागी तीन कॅरेटचा हिरा आणि दोन्ही बाजूंना सुमारे 10 कॅरेटचे हिरे आहेत. तिलकाच्या मध्यभागी वापरले जाणारे माणिक हे बर्मी माणिक आहे.

पाचूची अंगठी

रामलल्लाला 65 ग्रॅम वजनाची पाचूची अंगठी घालण्यात आली आहे. यात 4 कॅरेटचा हिरा आणि 33 कॅरेटचा पाचू आहे. एक गडद हिरवा झांबियन पाचू अंगठीच्या मध्यभागी आहे, जो देवाचा वन प्रवास, प्रभू रामाचा सुसंवाद आणि शहाणपणाचे प्रतीक आहे.

माणिकजडित अंगठी

रामलल्लाच्या उजव्या हातात 26 ग्रॅम सोन्याची माणिकजडित अंगठी आहे.

कंठहार

रामलल्लाच्या गळ्यात सुमारे 500 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आहे. रामलल्लाच्या या हारामध्ये सुमारे 150 कॅरेट माणिक आणि सुमारे 380 कॅरेट पाचू बसवण्यात आले आहेत. हाराच्या मध्यभागी सूर्य आहे. पाचू, माणिक आणि हिऱ्यांपासून बनवलेली फुले आहेत.

पंचलडी

हा रामलल्लाचा दुसरा हार आहे. पंचलडीचे वजन 660 ग्रॅम आहे आणि त्यात सुमारे 80 हिरे, सुमारे 550 कॅरेट पाचू आहेत. पंचलडी हार पंचतत्त्वांचे प्रतीक आहे.

विजयमाला

हा रामलल्लाच्या गळ्यातील सर्वांत मोठा हार आहे. त्याचे वजन सुमारे 2 किलो आहे. तो 22 कॅरेट सोन्याने बनलेला आहे. विजयमाला हारात हिंदु शुभचिन्हे कोरलेली आहेत. पाच पवित्र कमळपुष्पे, कुंड, पारिजात, चंपा आणि तुळस हे हाराच्या मध्यभागी कोरलेले आहे. या हारामध्ये विष्णुचे चिन्ह असलेले शंख आणि चक्रदेखील चित्रित केले आहे. हारांची लांबी इतकी आली आहे की, तो भगवान रामाच्या चरणांना स्पर्श करत आहे.

कंबरपट्टा

रामलल्लाचा कंबरपट्टा 750 ग्रॅम सोन्याने बनवला आहे. त्यात 70 कॅरेट हिरे आणि सुमारे 850 कॅरेट माणिक आणि पाचू आहेत. प्राचीन काळापासून कंबरपट्टा हा शाही अलंकार मानला गेला आहे. तो राजवैभव दर्शवतो.

बाजूबंद

रामलल्लाचा छोट्याशा बाहूंसाठी 400 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोन्याचे बाजूबंद तयार करण्यात आले आहेत.

मनगट्या

भगवान रामाच्या छोट्याशा हातांमध्ये 850 ग्रॅमच्या दोन मनगट्या आहेत. त्यात 100 हिरे आणि 320 पाचू आहेत.

खडावा

रामलल्लाच्या छोट्याशा चरणांसाठी खडावा तयार करण्यात आल्या आहेत. त्या 400 ग्रॅम सोने, 55 कॅरेटचे हिरे आणि 50 कॅरेटचे पाचू जडवण्यात आले आहेत.

चांदीची खेळणी

रामलल्ला ५ वर्षांचा बालक आहे; म्हणून त्याच्यासाठी खेळणीही बनवण्यात आली आहेत. चांदीचा घोडा, हत्ती, उंट, खुळखुळा तयार केला गेला आहे.

धनुष्यबाण

प्रभु श्रीरामाचे हे बालकरूप असले, तरी ते धनुर्धरी आहेत. त्यामुळे रामलल्लाच्या हातात धनुष्यबाण देखील आहे. हा धनुष्य बाण 24 कॅरेटच्या 1 किलो सोन्याने बनवलेला आहे. (Ayodhya Ram mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.