राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट आणि बाईक अॅंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका आणि बोट अँब्युलन्सचा (Ambulance) नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागांत कार्यरत आहेत. यापुढे १ हजार ७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागांत सेवा देणार आहेत.
गेल्या १० वर्षांत राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेक नवजात बालकांचा जन्मदेखील रुग्णवाहिकेत झाला आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा राज्यातील नागरिकांसाठी वरदायिनी ठरली आहे. समुद्र आणि नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने ३६ बोट अॅब्युलन्स विविध अपघाती समुद्रकिनारे आणि नदीपात्रांमध्ये तैनात होणार आहेत तसेच नवजात शिशुंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे. ही अॅम्ब्युलन्स जलद गतीने घटनास्थळी पोहोचणार आहे.
(हेही वाचा – Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या ३ पिलांचा जन्म )
नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या
अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट – २२
बेसिक लाईफ सपोर्ट – ५७०
बाईक अॅम्ब्युलन्स – १६३
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका – २५
बोट अॅंम्ब्युलन्स – ३६
हेही पहा –
Join Our WhatsApp Community