काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाममधून जात आहे. मात्र या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सोबत झटपट केली. त्यामुळे ही यात्रा अडचणीत आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
यात्रा शहरात घुसवण्याचा केला प्रयत्न
ही यात्रा आसाममध्ये येताच तेथील राजकीय वातावरण तापलेले आहे. २२ जानेवारीला राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मंदिरात जाणार होते, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली, तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्याना अडवण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत झटपट केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
(हेही वाचा Pakistan on Ayodhya Ram mandir : राममंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानचा जळफळाट; म्हणे आम्ही निषेध करतो…)
वाहतूक कोडींच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेला गुवाहाटी शहरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील खानापारा येथील गुवाहाटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने चौकात मोठी गर्दी झाली. यात्रा शहरात घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. तिथेही कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत झटपट केली. हे व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
Join Our WhatsApp Community