Myanmar Army Plane Crash: म्यानमारचे लष्करी विमान मिझोराममध्ये धावपट्टीवरून घसरले, ८ सैनिक जखमी

199
Myanmar Army Plane Crash: म्यानमारचे लष्करी विमान मिझोराममध्ये धावपट्टीवरून घसरले, ८ सैनिक जखमी
Myanmar Army Plane Crash: म्यानमारचे लष्करी विमान मिझोराममध्ये धावपट्टीवरून घसरले, ८ सैनिक जखमी

म्यानमारचे एक मिलिट्री एअरक्राफ्ट मंगळवारी मिझोराममधील (Myanmar Army Plane Crash) लेंगपुई विमानतळावर धावपट्टीवरून घसरले. यामध्ये क्रू मेंबर्ससहित १४ लोकांचा समावेश होता. या अपघातात ८ लोकं जखमी झाले असून ६ जण सुरक्षित असल्याची झाल्याची सूचना मिळाली आहे.

मिझोराममधील डीजीपी अनिल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोट्या आकाराचे एअरक्राफ्ट शानक्सी Y-8 या विमानाने म्यानमारमधून भारतात पळून आलेल्या सैनिकांना परत घेऊन जाण्यासाठी उड्डाण केले होते. मंगळवारी सकाळी १०:२० वाजता या विमानाचे उड्डाण होत असताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि जंगलात पडले. अपघातानंतर या विमानाची २ भागांत विभागणी करण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तिंना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल असोसिएशन (DGCA)धावपट्टीवरून घसरलेल्या विमानाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – Ambulance: राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार, बोट अँम्ब्युलन्स व नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश)

लेंगपुईला जाणाऱ्या सर्वच विमानांच्या उड्डाणाचा मार्ग बदलण्यात आला आहे. लेंगपुई विमानतळाची धावपट्टी ही एक टेबल टॉप रनवे आहे, जी डोंगराच्या माथ्यावर बांधलेली आहे. सामान्य धावपट्टीच्या तुलनेत येथे टेक ऑफ आणि लँडिंग करणे कठीण आहे.

१७ जानेवारीला म्यानमारमधून २७६ सैनिक पळाले
मिझोराम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्रोहींनी केलेल्या हल्ल्यातून रक्षण व्हावे यासाठी १७ जानेवारीला म्यानमारमधील २७६ सैनिक राज्यातील लाँगतलाई जिल्ह्यातील बोंडुकबांगसोरा गावात प्रवेश केला होता. यामध्ये एका कर्नलसह ३६अधिकारी आणि २४० लोअर रँकच्या सैनिकांचा समावेश आहे. या सैनिकांनी आसाम रायफल्सकडे आश्रय घेतला होता. त्यापैकी १८४ सैनिकांना सोमवारी म्यानमारमध्ये परत पाठवण्यात आले, तर ९२ सैनिकांना आज पाठवण्यात येणार होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.