- ऋजुता लुकतुके
अलीकडेच आशियाई हॉकी स्पर्धा विजेती आणि टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय पुरुषांच्या संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे. भारतीय संघाचा समावेश बी गटात आहे. आणि या गटात आहेत रिओ ऑलिम्पिक विजेते अर्जेंटिना, सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेले बेल्जिअम आणि मजबूत संघ असलेला ऑस्ट्रेलिया. याशिवाय न्यूझीलंड आणि आयर्लंडचा संघही बी गटात आहे. (Paris Olympic Hockey Draw)
भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. २०२०च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवून कांस्य पदक पटकावलं होतं. तर टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना या संघांना पराभूत केलं होतं. (Paris Olympic Hockey Draw)
Here are the pools for the men’s competition at the @Paris2024 #Olympics.
More details here : https://t.co/oInb4mA6dT#hockey #Paris2024 pic.twitter.com/WTJNXGSyyN
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 22, 2024
(हेही वाचा – Uddhav Thackeray : शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती; पक्षाच्या अधिवेशनात काय म्हणाले उद्धव ठाकरे?)
ऑलिम्पिकच्या ए गटात यांचा समावेश
यंदाच्या ऑलिम्पिकच्या ए गटात जर्मनी, नेदरलँड्स, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. (Paris Olympic Hockey Draw)
पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धा रविवारी संपल्या आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता मिळवलेले १० संघ निश्चित झाल्यानंतर लगेचच २२ जानेवारीला आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने ऑलिम्पिकसाठीचा ड्रॉ जाहीर केला आहे. (Paris Olympic Hockey Draw)
भारतीय महिला हॉकी संघ मात्र यावेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेला नाही. तीन वर्षांपूर्वी टोकयो ऑलिम्पिकमध्ये महिलांचा संघ चौथा आला होता. पण, अलीकडेच रांचीमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ प्राथमिक फेरीतच बाद झाला. त्यामुळे संघाची ऑलिम्पिक पात्रता हुकली. (Paris Olympic Hockey Draw)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community