Ayodhya: राम मंदिराबाहेरील गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचे पथक अपुरे, चुकीची घटना घडू नये यासाठी एटीएस कमांडो दाखल

मंगळवारपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले, पण भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

171
Ayodhya: राम मंदिराबाहेरील गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचे पथक अपुरे, चुकीची घटना घडू नये यासाठी एटीएस कमांडो दाखल
Ayodhya: राम मंदिराबाहेरील गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचे पथक अपुरे, चुकीची घटना घडू नये यासाठी एटीएस कमांडो दाखल

अयोध्येत उभारलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घ्यावे, या भावनेने अनेक भक्त भाविकांनी राम मंदिरात मोठी गर्दी केली आहे. मंदिराबाहेर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

मंदिराबाहेरील गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचे पथक अपुरे पडत आहे. भाविकांमध्ये कोणतीही गडबड होऊ नये यासाठी एटीएस कमांडोंची टीम आणि आरएएफ मंदिरात तपासणी आणि सुरक्षेसाठी पाठवण्यात आलं आहे.

Ayodhya Raam Mandir: श्रीराम मंदिरात स्थापन होणार सोन्याच्या पादुका, वाचा वैशिष्ट्यपूर्ण माहिती…

मंगळवारपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले, पण भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी अॅडव्हायजरी जारी करून रामभक्तांना अयोध्येच्या दिशेने न जाण्याचे आवाहन केले आहे.

अयोध्येच्या दिशने न जाण्याचे आवाहन
मंदिरातील वाढती गर्दी पाहून एटीएस आणि आरएएफच्या जवानांना रामलला मंदिराच्या आत पाठण्यात आले असून, रामलल्लाचे दर्शनही काही काळ थांबवण्यातआले. भाविकांच्या आडून कोणतीही चुकीची घटना घडू नये, यासाठी एटीएस कमांडोजची टीम मंदिरात शोध मोहीम राबवत आहे. या गर्दीमुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलीस सक्रीय झाले.  अयोध्येपासून ६० किमी. अंतरावर असलेल्या बाराबंकी येथील पोलिसांनी भाविकांना अयोध्येच्या दिशने न जाण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.