‘पीएमपी’च्या (PMP) ताफ्यात जूनपर्यंत ५०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. यामध्ये ४०० भाडेतत्त्वावर, तर १०० स्वमालकीच्या असतील. याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बसची संख्या वाढणार असली, तरी ठेकेदारांच्या बसची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे ‘पीएमपी’मध्ये पुन्हा ठेकेदारांचे वर्चस्व वाढणार असून येत्या काळात ‘पीएमपी’साठी (PMP) डोकेदुखी ठरू शकते. (PMP)
‘पीएमपी’च्या (PMP) संचालक मंडळाच्या बैठकीत ४०० सीएनजी बस भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली. यापूर्वी १०० बस स्वमालकीच्या घेण्याबाबतचा निर्णय झाला होता. दोन्ही मिळून ५०० बस जूनपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. एप्रिल-मे सुट्ट्यांचा काळ असल्याने प्रवासी संख्या कमी असते. जूनपर्यंत नवीन बस दाखल होत असल्याने विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. बस १२ मीटर आकाराच्या आहेत. (PMP)
(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिराबाहेरील गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचे पथक अपुरे, चुकीची घटना घडू नये यासाठी एटीएस कमांडो दाखल)
सध्या ई-बसच्या (e-bus) पुरवठ्यासंदर्भात अडचणी येत असून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ‘पीएमपी’ (PMP) ई-बसच्या प्रतीक्षेत आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ‘पीएमपी’ने ‘सीएनजी’ बस (CNG bus) खरेदीचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य आहे. (PMP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community