Muslim : नया नगरमध्ये सोमवारी धर्मांध मुसलमानांचा उन्माद; मंगळवारी पालिकेने फिरवला ‘बुलडोझर’

1286

अयोध्येतील श्रीरामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात हिंदू सोमवार, २२ जानेवारी रोजी आनंदोत्सव साजरा करत होते. त्यानुसार मीरा रोड इथेही हिंदूंनी शोभायात्रा काढली होती. मात्र या शोभायात्रेवर नया नगर येथे धर्मांध मुसलमानांनी (Muslim) हल्ला केला. दगडफेक, लाठीहल्ला आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेतली. पोलिसांनी तातडीनेदंगलखोर मुसलमानांची धरपकड केली. त्यानंतर मंगळवारी चक्क मीरा-भाईंदर महापालिकेने चक्क नया नगर येथे बुलडोझर पाठवला आणि तेथील बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. सोमवारी नया नगरमध्ये मुसलमानानी (Muslim) उन्माद दाखवला आणि मंगळवारी त्यांची घरे जमीनदोस्त झाली, ही उत्तर प्रदेशातील बुलडोझर बाबा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रणनीती आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

मंगळवारी सकाळीच मीरा-भाईंदर महापालिकेने नया नगर येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाईची तयारी सुरु केली. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे पालिका उपायुक्त मारूती गायकवाड यांनी सांगितले. मात्र सोमवारी नया नगर येथे हिंदूंच्या शोभायात्रेवर येथील मुसलमानांनी (Muslim) केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमच्याकडे पालिकेने बंदोबस्त मागितला होता. तो आम्ही दिला असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) जयंत बजबळे यांनी सांगितले.

(हेही वाचा Muslim : मीरा रोडप्रमाणेच मुंबईतील परळ, सांताक्रूझमध्येही धर्मांध मुसलमानांचा दंगल घडवण्याचा होता कट)

काय घडले होते नया नगरमध्ये? 

अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Shri Ram Mandir) श्रीरामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी (Muslim) अक्षरशः शोभायात्रेतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर लाठ्या काठ्या, रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक रामभक्त हिंदू जखमी झाले. अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले. जखमींमध्ये चार तरुण गंभीर जखमी झाले असून जवळपास वीस जणांना किरकोळ मार लागला. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित  धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.  मध्यरात्री नया नगर पोलीस ठाण्यात दंगल करणे, समाजात तेढ निर्माण करणे तसेच हत्येचा प्रयत्न करणे अशा विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिवसभरात हल्लेखोरांची धरपकड करून २२ जणांना ताब्यात घेतले होते, त्यापैकी रात्री उशिरापर्यत १४  जणांना अटक करण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.