CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

सत्तेच्या लालसेपोटी ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देवो, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

167
CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. ज्या काँग्रेसला वंदनीय बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कडेवर घेतले. निवडणूक एकाबरोबर जिंकल्या आणि सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेले. जी अवस्था अहंकारी रावणाची झाली, तीच अवस्था यांची होईल, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी (२३ जानेवारी) केली. सत्तेच्या लालसेपोटी ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देवो, असा टोलाही त्यांनी लगावला. (CM Eknath Shinde)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी बाळासाहेब भवन येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही आधीचे सरकार उलथवून लावून जनतेचे सरकार स्थापन केले. आज ते आमचा विरोध करतात, आम्हाला रावण म्हणतात. राम कोण आणि रावण कोण हे सर्व जनतेला ठाऊक आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला त्यांना रामाबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही. जो राम का नही वह किसी काम का नही, असे शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सुनावले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Republic Day 2024 : २६ जानेवारीच्या परेडमध्ये दिसणार भगवान रामलला)

वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या विचारांना अभिप्रेत सरकार आम्ही स्थापन केले. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असायचे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही समाजातील सर्व घटकांना, महिला, शेतकरी, युवावर्ग, अबालवृद्धांना न्याय देण्याचे काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे सर्वांगीण विकासाला आणि स्वच्छता तसेच आरोग्याला प्राधान्य द्यायचे म्हणून त्यांच्या नावाने आपण ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग’ सुरु केला. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु केला. ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख कार्यक्रम सुरु केला. ज्याचा लाभ आतापर्यंत २ कोटी २० लाख जनतेने घेतला आहे. अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. अयोध्येमध्ये राममंदिर पूर्ण झाले आणि काल २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास आले. मुख्य म्हणजे त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राममंदिराचे लोकार्पण झाले, ही बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरली. आज बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येक शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेतर्फे ११ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी दिली. (CM Eknath Shinde)

मराठा समाजाने संयम बाळगावा

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आणि सकारात्मक आहे. ओबीसी समाज आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. ही सरकारची जबाबदारी आहे. संपूर्ण मागासवर्ग आयोग त्यासाठी २४ तास तीन शिफ्टमध्ये दीड लाख लोक काम करत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिटयूट त्यासाठी काम करत आहेत. आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा सरकार करणार आहे. ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. हा शब्द सरकारने दिलेला आहे. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलनाची भूमिका न घेता संयम बाळगावा आणि राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांना केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.