काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती म्हैसूर येथील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे.
ही मूर्ती ५१ इंचाची असून ५ वर्षीय बालकाचे रूप, या मूर्तीला देण्यात आले आहे.
कर्नाटकातील काळ्या पाषाणातून रामललाची मूर्ती घडवण्यात आली आहे.
रामलल्लाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला भगवान विष्णूचे अवतार कोरलेले आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे दहा अवतार मूर्तीवर कोरलेले आहेत.
IIT हैदराबादच्या तज्ज्ञांनी शास्त्रोक्त पद्धतीने, कोणत्या मूर्तीचे आयुष्य जास्त आहे, मूर्तीची चमक किती वर्षे टिकेल, याचा अभ्यास करून दगडाची निवड केली आहे.
मूर्तीवर प्रकाश पडल्यावर कोणती मूर्ती अधिक भव्य दिसेल याचाही अभ्यास करण्यात आला आहे.