मीरा रोड (Mira Road Naya Nagar) येथे मिरवणुकीवर हल्ला करणारे कोण आहे, त्यांचा बोलवता धनी कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १४ जणांची पार्श्वभूमी तपासली जात आहे, तसेच या हल्लेखोरांचा कुठल्या संघटनेशी संबंध आहे का, याचा देखील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड, नया नगर (Mira Road Naya Nagar) येथील लोधा रोड या ठिकाणी रविवारी रात्री साडे दहा वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावर अचानक ५० ते ६० जणांच्या एका टोळीने भगवे झेंडे लावलेल्या वाहनांना लक्ष्य करून वाहनांची तोडफोड करून वाहनात बसलेल्यांना रॉडने मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून जवळपास २० जण जखमी झाले असून त्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर नया नगर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
(हेही वाचा Muslim : नया नगरमध्ये सोमवारी धर्मांध मुसलमानांचा उन्माद; मंगळवारी पालिकेने फिरवला ‘बुलडोझर’)
हल्लेखोरांचे दहशतवादी संघटनेसोबत संबंध?
या हल्ल्याप्रकरणी नया नगर (Mira Road Naya Nagar) पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, दंगल, दोन धर्मात तेढ निर्माण करणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नया नगर पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांची धरपकड सुरू करून १४ जणांना अटक केली आहे. उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथके तयार करण्यात आली आहे. घटनास्थळांवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता असून या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड वेगळाच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासली जात असून हल्लेखोर कुठल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे का, हे तपासले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community