शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारी नाशिक मधील काळाराम मंदिरातील आरती व पूजा दरम्यान वेगळ्या वेषात पहायला मिळाले. बाळासाहेब ज्याप्रमाणे भगव्या रंगाचा सदरा आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालायचे, तशीच वस्त्रे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी परिधान करत आपले वेगळे दर्शन या पूजेदरम्यान शिवसैनिकांना तसेच महाराष्ट्रातील जनतेला घडवले. आपणच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत, हे अशाप्रकारे वेष परिधान करून बाळासाहेबांच्या छबीचे एक प्रकारे प्रतिबिंब शिवसैनिकांच्या मनावर उमटवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी परिधान केलेला भगवा सदरा आणि गळ्यात धारण केलेल्या रुद्राक्षाची माळ घालून आपण आजही कडवट हिंदुत्वावादी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या ‘इंडी’ आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक तथा मित्र पक्षाला भगवे विचार मान्य होतील का असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले आहेत. (Uddhav Thackeray)
आयोध्यातील मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी पार पडली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण असतानाही शिवसेना उबाठा (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अयोध्येला न जाता त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा व आरती करण्याचा निर्णय घेतला. या पुजेदरम्यान उद्धव ठाकरे हे भगव्या सदरा आणि गळ्यात रुद्राक्ष घालून प्रकटले. काळाराम मंदिरात त्याच दिवशी पुजा करून बाळासाहेबांप्रमाणे आपला लूक करून प्रकटणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे या वेषात आपणच बाळासाहेबांप्रमाणे दिसत आहोत, मीच बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन)
नोव्हेंबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) जुळवून घेत राज्यात सरकार स्थापन केले आणि पुढे शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) सामील झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या धर्म निरपेक्षवादी पक्षासोबत आघाडी केली असून अयोध्येतील मंदिरात राम लल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काळाराम मंदिरात जाऊन ही पुजा आणि आरती करताना जी भगवी वस्त्रे धारण केली. ती महाविकास आघाडीला मान्य होतील का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाळासाहेबांच्या विचाराचे चालतील असाही प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. (Uddhav Thackeray)
त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जर बाळासाहेबांच्या विचारांचा मीच खरा वारसदार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते विचार इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांना मान्य होणारे नसेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा विचार जर पुढे घेऊन जायचे असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तथा वचिंत आघाडीपासून बाजुला होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community