Karpoori Thakur: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा

177
Karpoori Thakur: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा
Karpoori Thakur: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा

केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्यात येणार आहे.

कर्पूरी ठाकूर यांची २४ जानेवारीर रोजी १००वी जयंती आहे. याच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने त्यांना हा सन्मान देण्याची घोषणा केली आहे. ते मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते.

(हेही वाचा – Balasaheb Thackeray Smriti Sthal : शिवसेनेला बाळासाहेबांचाच विसर, स्मृतीस्थळावर सर्वांनी फिरवली पाठ )

कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते. सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणार ते बिहारमधील तिसरे व्यक्ती असणार आहेत. त्यांच्या आधी हा सन्मान पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना देण्यात आला होता.

यावेळी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन दिवस आधी भारतरत्न जाहीर केला आहे. २४ जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना मरणोत्तर देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.