Rohit Pawar यांची बुधवारी ईडी चौकशी; शरद पवार पक्ष कार्यालयात थांबणार

पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या तसेच संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे रहावे. कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा आहे आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे, असे रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटले आहे.

144
Sunetra Pawar Nomination : रोहित पवारांची नेटकऱ्यांनी ‘X’वर अक्षरशः काढली...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या, बुधवारी (२४ जानेवारी) अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी केली जाणार आहे. या चौकशीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मुंबईत पक्षाच्या कार्यालयात थांबणार आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासोबत ईडी (ED) कार्यलयात जाणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीआधी शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर आता पवार कुटुंबातील रोहित पवार (Rohit Pawar) चौकशीला सामोरे जात आहेत. (Rohit Pawar)

रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी संबंधित बारामती ऍग्रो या कंपनीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. या छाप्यानंतर ईडीने रोहित पवार (Rohit Pawar) यांना २४ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस काढली होती. त्यानुसार रोहित पवार उद्या बुधवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. या चौकशीच्या काळात पक्ष कार्यालयात जातीने हजर राहून आपण रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश शरद पवार देणार आहेत. ईडीचे कार्यालय हे राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. (Rohit Pawar)

दरम्यान, आपण यापूर्वी जसे ईडीला (ED) सहकार्य केले तसेच आताही पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचे सूडाचे राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये. उलट पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या तसेच संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे रहावे. कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा आहे आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स (X) या समाज माध्यमावर म्हटले आहे. (Rohit Pawar)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका)

मी सुद्धा एक मराठी माणूस, लढत राहणार! – रोहित पवार 

माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडे राजकारण न समजण्याच्या पलीकडचे आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या सुप्रियाताई आणि स्वतः पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय! असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नमूद केले आहे. (Rohit Pawar)

दरम्यान, राजकीय द्वेषातून ही कारवाई झाली असेल तर या सर्व लोकांच्या वतीने मी लढणार. लोकशाही आणि कुणाचाही आवाज दाबण्यासाठी जर यंत्रणेचा वापर केला जात असेल, तर मराठी माणूस कधी शांत बसत नाहीत. मराठी माणूस कधी पळून जात नाहीत. ते लढतात आणि मी सुद्धा एक मराठी माणूस म्हणून या सर्व तपासाच्या बाबतीत लढत राहणार, असा निर्धार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. आमचे कार्यकर्ते हे प्रामाणिक आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यास नेहमी ते तयार असतात. कोणावर अन्याय होत असेल तर ते नेहमी पुढाकार घेतात. इथं आल्यानंतर कार्यकर्ते कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाहीत. तथापि उद्या कुणीही मुंबईमध्ये गर्दी करू नये! असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. (Rohit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.