Mira Road Naya Nagar तपास यंत्रणेच्या रडारवर; डिसेंबर महिन्यात नया नगरमधून एका संशयिताला घेतलेले ताब्यात

10414
कुर्ल्यानंतर सिमी या संघटनेचा गड म्हणून नव्याने ओळख निर्माण झालेल्या मीरा रोड स्थित नया नगर (Mira Road Naya Nagar) हा पूर्वीपासून तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने गेल्या महिन्यात महाराष्ट्रात ४४ ठिकाणी केलेल्या छापेमारीत नया नगर या ठिकाणी छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले होते.

संशयित इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा म्होरक्या साकीबच्या संपर्कात होता

एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकाने डिसेंबर महिन्यात केलेल्या छापेमारीत मिरा भाईंदर परिसरातील नया नगरचा समावेश होता. नया नगर येथून एनआयएने एका संशयिताला ताब्यात घेतले होते. इसिस या संघटनेशी संबंधित असणाऱ्या या संशयितांची या प्रकरणात कसून चौकशी देखील करण्यात आली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नया नगरमधून (Mira Road Naya Nagar) ताब्यात घेण्यात आलेला संशयित इसिसचा महाराष्ट्र मॉड्युलचा म्होरक्या साकीब नाचणच्या संपर्कात होता. घराची झाडाझडती घेण्यात आली. मिरा रोडच्या नया नगर भागात ही छापेमारी करण्यात आली. एनआयएने संशयित व्यक्तीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले होते.

सिमीच्या कार्यकर्त्यांनी नया नगरमध्ये आश्रय घेतलेला

२००१ मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातनंतर स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर या संघटनेचे मुंबईतील कार्यालय कुर्ला पश्चिम पाईप रोड या ठिकाणी होते, या कार्यालयाला सिल ठोकण्यात आले होते. या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना बॉम्बस्फोटात अटक करण्यात आली होती. कुर्ला येथे राहणाऱ्या सिमीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाल्यानंतर त्यांनी मीरा रोड स्थित नया नगरमध्ये (Mira Road Naya Nagar) आश्रय घेतला होता, तेव्हापासून नया नगर हे तपास यंत्रणेच्या रडारवर असून या ठिकाणी अजूनही छुप्या कारवाया करण्यात येत आहे. रविवारी झालेला हल्ला त्यातील एक भाग असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.